बिनविरोध महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून दादाराव केचे यांची निवड झाल्याबद्दल आर्वीत भव्य जल्लोष, दादाराव केचे यांचे ठिक ठिकाणी स्वागत

0
421
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी विधानसभा क्षेत्राला पुन्हा एक आमदार मिळाल्याने संपूर्ण आर्वी शहरात विजयाचा जल्लोष

आर्वी, ता. प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार पदावर दादाराव केचे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल स्वागताकरिता हजारोच्या संख्येनी शिवाजी चौक आर्वी येथे दादाराव केचे यांच्या आर्वी तालुक्यातील चाहात्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून दर्शविली उपस्थिती.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षानी दादाराव केचे यांची तिकीट कापून सुमित वानखडे यांना तिकीट देण्यात आली होती. तेव्हा दादाराव केचे यांनी हजारो संखेच्या उपस्थितीत अपक्ष अर्ज दाखल करून नाराजी व्यक्त केली होती परंतु पक्षानी याची लगेच दखल घेत केंद्रीय गृहमंत्री मा.अमितजी शाहा यांनी तुम्हाला विधान परिषदेवर घेऊन तुमचं पुनर्वसन करू असे दादाराव केचे यांना आश्वासन देऊन अश्वस्थ केले होते. त्याप्रमाणे दादाराव केचे यांनी सुमित वानखेडे यांच्या विरुद्ध दाखल केलेला अर्ज परत घेतला तसेच केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाहा यांनी दिलेला शब्द पाळल्याने दादाराव केचे यांनी हजारोच्या संख्येत भाजप कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत शिवाजी चौक येथे केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाहा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आमदार दादाराव केचे यांनी आपल्या शब्दातून अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

पक्षाने आमच्यावर विश्वास टाकून आर्वी तालुक्याला जनतेच्या आशीर्वादातून दोन आमदार दिले आता आर्वी तालुक्याचा उर्वरित विकास दोघं मिळून करू असे यावेळी आर्वी विधानसभा क्षेत्र आमदार सुमित वानखडे यांनी आर्वी तालुक्यातील नागरिकांना अश्वस्थ करून आपले मत व्यक्त केले.

तसेच नुकत्याच झालेल्या विधान सभेच्याच्या निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार म्हणून सुमित वानखडे ४० हजार मतानी निवडून आल्याबद्दल विधान परिषद आमदार दादाराव केचे यांनी सुमित वानखडे यांना सन्मान चिन्ह, शील्ड देऊन स्वागत व अभिनंदन केले व तसेच दादाराव केचे यांची बिनविरोध महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार सुमित वानखडे यांनी शिवाजी चौक येथे हजारो संख्येच्या उपस्थितीत जेसीपीने फुलांचा वर्षाव करून हार टाकून अभिनंदन केले.
महाराष्ट्र विधान परिषद आमदार दादारावजी केचे व आर्वी विधानसभा क्षेत्र आमदार सुमित वानखडे यांनी शिवाजी चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माला अर्पण करून जल्लोष विजय रॅलीची सुरुवात करण्यात आली व विजयाचा जल्लोष करून डीजे व ढोल ताशांच्या गजरात शिवाजी चौक येथून गांधी चौक, इंदिरा चौक, बस स्टॉप ते सहकार मंगल कार्यालया पर्यंत हजारो संख्येच्या उपस्थितीत जल्लोष रॅली काढून ठिक ठिकाणी आमदार दादाराव केचे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

veer nayak

Google Ad