चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील महाबोधी विहार हे इतर धर्मियांच्या ताब्यात आहे त्यामुळे सदर महाबोधी विहार हे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी आज चांदुर रेल्वे तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा व डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील 1949 चा महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार बोद्धांच्या ताब्यात देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार समिती भारतीय बौद्ध महासभा डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सुनील वानखडे धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हाध्यक्ष बंडू आठवले, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष सुरेश मेश्राम, भारतीय बौद्ध महासभेचे प्रेमचंद अंबादे, सिद्धार्थ चिकटे, कॉम्रेड जिल्हाध्यक्ष देविदास राऊत, अशोक मोटघरे, अशोक नंदेश्वर, मनोज गवई, रोशन गडलिंग,विलास डोळस,अभय रामटेके,भीमशंकर चव्हाण, अमोल चतुर,उपस्तित होते.