श्रीकृष्ण हायस्कूल तर्फे बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनींना सायकल वाटप दानदात्यांच्या वतीने सायकल वितरण,अनेक वर्षापासून सुरू आहे शाळेचा उपक्रम

0
69
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तालुका प्रतिनिधी/ चांदूर रेल्वे:-

श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,आमला विश्वेश्वर व दानदाते यांच्या वतीने परगावावरून ये-जा करणार्‍या विद्यार्थींनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

ईश्वर चिठ्ठीने सहा सायकल ची सोडत काढण्यात आली.त्यामध्ये स्व.सुरेश महादेवराव काटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मंगेश सुरेश काटे यांच्या कडून शारदा नितीन शेळके (वर्ग ७ वा.सालोरा खुर्द),स्व.केशवराव गोविंदराव खेरडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दीपक केशवराव खेरडे तर्फे श्रावणी धनराज जवंजाळ (वर्ग ७ वा.टेंभूर्णी ),स्व.रंगनाथ तुकारामजी अवधुतकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारती रंगनाथ अवधुतकर तर्फे राणी विजय चव्हाण (वर्ग ८ वा कारला),स्व.पार्वताबाई बळीराम ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतिभा अरविंद बनसोड यांच्याकडून खुशी राजु राठोड (वर्ग ५ वा.पाथरगाव),पंकज सोमेश्वर जिरापूरे,जळका जगताप यांच्या तर्फे गौरी राजेश खेरडे (वर्ग ७ वा जळका जगताप),स्व.मधुकरराव राजाराम बोराळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अक्षय सुभाष चिंचोळकर यांच्याकडून अक्षरा अनिल राठोड (वर्ग ७ वा,सालोरा खुर्द) यांना सायकलचे वाटप करण्यात आले.

मागील अनेक वर्षापासून बाहेरगावावरून ये-जा करणार्‍या विद्यार्थींनीसाठी शाळा हा उपक्रम राबवित आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक खेरडे,प्रमुख पाहूणे संस्थेचे उपाध्यक्ष विनोद बकाले,सचिव मधुकर नेरकर,कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रल्हादराव बकाले,पुंडलिकराव बकाले,माजी प्राचार्य शंकरराव मालधुरे,राजीव बकाले,माजी जि.प.सदस्य उमेश केणे,सोमेश्वर जिरापूरे,दादाराव बकाले,माजी शिक्षक रंगराव पाटील,माजी प्राचार्य सुरेश देवळे,वीरेंद्र बकाले,माजी प्राचार्य प्रा.प्रसेनजित तेलंग,महादेव हेरोडे,गोपाळ बकाले आदि मान्यवरांसह शिक्षक,विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad