तिवसा – भुषण रामचंद्रजी यावले यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष (अमरावती ग्रामीण)पदी निवड करण्यात आली आहे.भुषण यावले यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित,पिडीत,व अन्यायग्रस्त, गोरगरीब नागरिकांना आपल्या लेखणीतून न्याय देण्यासाठी लढा उभारला.एवढेच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तथा औद्योगिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.व अल्पावधीतच युवा उद्योजक म्हणून नावारूपास आले.
तसेच शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी राहुन आपल्या मा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तिवसा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली.त्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केन्द्रीय अध्यक्ष मनोहर सुने व कार्यकारिणीने त्यांचेवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.त्यांच्या निवडीबद्दल केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, महासचिव सुरेश सवळे, प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख , महाराष्ट्र महिला अध्यक्ष जयश्री पंडागरे ,अशोक पवार, राजेंद्र भुरे, बाळासाहेब सोरगिवकर, बाळासाहेब खडसे तसेच केंद्रीय व प्रदेश कार्यकारणी पदाधिकाऱ्यांकडून
समाधान व्यक्त करण्यात येत आहे.