चांदुर रेल्वे : ग्रामपंचायत च्या अधिनियमानुसार दरमहा ग्रामपंचायत मध्ये मासिक सभेचे आयोजन करणे हे अनिवार्य आहे त्याकरिता सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संख्या बळ तसेच सचिव असणे कायदेशिर हजर राहावे लागते,मात्र २९/१०/२०२५ रोजी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेला सचिव सह ११ सदस्य पैकी फक्त ५ सदस्य हजर होते यावेळी ग्राम सभा तहकूब न करता मासिक सभा घेत सरपंचांनी चपराशीच्या हाताने बेकायदेशीर रित्या प्रोसिडिंग लिहून घेतले, जबाबदारी निश्चित केलेल्या कडूनच ग्रामपंचायत सभेच्या अधिनियमाचे उल्लंघन केल्या बाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्य विनोद रमेश निचत प्रणाली निलेश डकरे,यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे,
२६/११/२०२५ संविधानाच्या दिवशी मालखेड रेल्वे ग्रामपंचायत मधील सदस्यांनी दिलेल्या तक्रारा री नुसार २९/१०/२०२५ नुसार ग्रामपंचायत मध्ये मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेमध्ये ११ सदस्य पैकी ५ सदस्य हजर होते,त्यामुळे सभेकरिता लागणारा सदस्यांचा कोरम अपूर्ण होता,तर सचिव सुद्धा यावेळी हजर नसताना मासिक सभा घेण्यात आली, यावेळी ग्रामसेवका चे आदेशाने नुसार शिपायाच्या हाताने सभेची प्रोसिडिंग लिहिण्यात आली त्यामुळे सभेमध्ये पास झालेले सर्व कामे ना मंजूर करण्यात यावे, ग्रामसेवक यांचे हस्तक्षर प्रोसिडिंग वरील ग्रामपंचायत सदस्यांना ओळखू येत नसल्याने आर्थिक व्यवहार झाले असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा निधी सामान्य फंड 3 सभागृह व पंधराव्या वित्त आयोग निधीसह अपूर्ण विकास कामाच्या खर्चाला मान्यता ग्रामसेवकांनी घेतली, कोरम अभावी न झालेल्या मासिक सभेतील सदस्यांच्या सह्या घेऊन बेकायदेशीर आर्थिक अनियमित्ता यामध्ये झाली आहे त्यामुळे तक्रारीतील मुद्द्याची सखोल चौकशी करून दोशींवर कारवाई करण्याची मागणी २६/११/२०२५ रोजी दिलेल्या निवेदनात करण्यात आली,
















