# भिलाजी महाराज यात्रा पुण्यतिथी महोत्सव
# भिलाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
चांदूर रेल्वे
तालुका प्रतिनिधी प्रविण शर्मा
चांदूर रेल्वे शहरा पासुन ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळजापूर शेत शिवारा मध्ये भिलाजी महाराज मंदिर शेषनाग मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भिलाजी महाराज यात्रा पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने रविवार ११ फेब्रुवारी भिलाजी महाराज मंदिरात एक दिवसीय भव्य यात्रा महोत्सव होणार असून भक्तांनी दर्शन व यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा महोत्सव समिती तुळजापूर यांनी केले आहे.
तालुक्यातील तुळजापूर शेत शिवारात भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखाली असलेले पुरातन शेषनाग मंदिर भिलाजी महाराज या नावाने प्रसिद्ध असून या शेत शिवारात दही हांडी,महाप्रसाद व एक दिवसीय यात्रा महोत्सव जुन्या काळापासून होत असत या वर्षी भिलाजी महाराज यात्रा महोत्सव समितीने या शेत शिवारात भव्यदिव्य मंदिराचे जिर्णोद्धार करत भिलाजी महाराज मूर्ती व शंकराच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा ८ फेब्रुवारी रोजी विधीवत पूजा अर्चना करून केली असून रविवार दिनांक ११ फेब्रुवारी भिलाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने तुळजापूर शेत शिवारात एक दिवसीय यात्रा महोत्सवात तसेच दहीहंडी व महाप्रसादाच्या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आला आहे तरी तालुक्यातील भक्तांनी भिलाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा मूर्तीच्या दर्शन व यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा महोत्सव समिती तुळजापूर यांनी केले आहे.