भरारी  कर्मचारी सुस्त: रेतीमाफीया मस्त : घरकुलधारक रेतीसाठी त्रस्त  एकीकडे घरकुल धारकांची रेतीसाठी पायपीट  :  तर दुसरीकडे पोकलेन ने दिवसरात्र उपसा सुरुच  महसुल च्या अधिकाऱ्यांनी घेतले धृतराष्ट्राचे सोंग: ग्रामपंचायत ने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 

0
210
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब
तालुका प्रतिनिधी 
धामणगाव रेल्वे: काही दिवसांपुर्वी मिळणारी दगड धोंडे मिश्रीत रेतीही आता घरकुलधारकांना मिळेनाशी झाल्याने धामणगांव रेल्वे तालूक्यातील घरकुलधारकांचे बांधकाम अर्ध्यावरच अडकुन पडल्याचे चित्र आहे. दरम्यान धामणगांव रेल्वे तालूक्यासह वरीष्ठ महसुल अधिकारी रेती माफीयांवर कारवाईच्या बाबतीत कमालीचे सुस्त असल्याने रेतीमाफीयांचे मस्त फावले असुन नियमबाह्य रित्या रेती घाटातुन पोकलेनच्या सहाय्याने दिवस रात्र वाळूउपसा सुरु आहे. दरम्यान महसुलच्या अधिकाऱ्यांना या सदंर्भात सुचना देण्यासाठी संपर्क केला असता फोन च उचलत नसल्याने कारवाईचा प्रश्नच उद्‌भवत नाही असा प्रकार सर्रास पाहावयास मिळत आहे. पुलगांव क्षेत्रातील रेती घाटावर यंत्रांच्या सहाय्याने होत असलेल्या रेती उत्खनना संदर्भात तात्काळ कारवाई करीत तेथील अधिकाऱ्यांकडून २ कोटीच्या वर मुद्देमाल अलीकडेच जप्त केला गेला असतांना अमरावती जिल्ह्यातील महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांचे धामणगांव रेल्वे तालूक्यातील शासकीय रेती डेपोवर अर्थपूर्ण दुर्लक्ष ठेवले आहे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
धामणगांव रेल्वे तालूक्यातील घरकुल धारकांना वाळू साठी तहसील कार्यालयातील सेतु मार्फत  अधिकृत बुकींग करुन सुध्दा वणवण फिरावे लागत आहे. तर दुसरीकडे तहसील कार्यालयात विचारणा केली असता घरकुलधारकांसाठी रेती साठा संपल्याचे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत असल्याचा आरोप घरकुलधाकरांनी केला आहे. एकीकडे घरकुलधारकांसाठी रेती उपलब्ध नसतांना दुसरीकडे शासकीय रेती डेपोत साठा करण्यासाठी गोकुळसरा घाटातुन दिवसरात्र पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु असुन या नियमबाह्य उपस्यावर तक्रार करुन ही कुठलीच कारवाई होत नसल्याने महसुल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान रेती डेपोत सुरु असणाऱ्या नियमबाह्य उत्खननाचे चित्रीकरण करण्यास गेले असता डेपोमालक धमकावित असल्याने तशी तक्रार सुध्दा १ महिन्यांपासुन जिल्हाप्रशासनाकडे प्रलंबित आहे. असे असुन सुध्दा रेतीमाफीयांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने रेतीमाफीयांकडे महसुल विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप घरकुलधारकांनी केला असुन कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
————————————————————-
चांदुर रेल्वे  उपविभागीय अधिकाऱ्यांचा  पोकलेनच्या व्हिडीओंवर  ‘नोरिस्पाँस‘
तालूक्यातील रेतीघाटात कुठलीही परवानगी नसतांना पोकलेन च्या सहाय्याने सुरु असलेल्या उत्खननाचा रंगेहात पर्दाफाश करुन कारवाई व्हावी याकरीता उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांना रेती घाटातुनच शुक्रवार दि.२९ मार्च रोजी दोन ते तीन वेळा कॉल केला त्यानंतर व्हिडीओ कॉल सुध्दा केला मात्र त्यानंतर ही ‘नो रिस्पाँस‘ आल्याने शेवटी घटनास्थळावरुनच पोकलेनचा व्हिडीओ सुध्दा टाकण्यात आला मात्र सदर घटनेस तब्बल तीन दिवस उलटून सुध्दा सदर प्रकरणी कुठलाच प्रतीसाद नसल्याने महसुल अधिकाऱ्यांचे रेतीमाफीयांशी लागेबांधे तर नाही ना ? अश्या चर्चानी  तालूक्यात जोर धरला आहे. 
 ————————————————————-
पुलगांव पोकलेनच्या वापरावर कारवाई ! मग धामणगांवात वापर सुरु कसा?
धामणगांव रेल्वे तालूक्यातील रेतीमाफीयांचा हैदोस सुरु असुन तालूक्यातील  महसुल विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन पोकलेनच्या सहाय्याने गोकुळसरा भागातुन अवैध उत्खनन सुरुच आहे. अलीकडे पुलगांव परीसरातील अधिकाऱ्यांनी पोकलेनच्या वापरावर कडक कारवाई करीत २ कोटीच्या वर मुद्देमाल जप्त केला असतांना धामणगांव रेल्वे तालुक्यात सुरु असलेला पोकलेन चा वापर नियमानुसार कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
 ————————————————————-
महसुलमंत्र्यांच्या जिल्हयापासुन सर्वदुर पोकलेनचा वापर, कारवाई करावी तरी कशी ?
या संदर्भात तहसीलदार गोविंद वाकडे यांचेशी संपर्क केला असता महसुल मंत्र्यांच्या जिल्यापासुन ते थेट धामणगांव रेल्वे पर्यंत सर्वच रेतीघाटात पोकलेन ने उपसा सुरु असल्याने कारवाई करायची तरी कशी ? असा जावईशोध लावीत रेतीघाटातील पोकलेनच्या वापरावरील कारवाई संदर्भात कानावर हात ठेवले आहे. दरम्यान तुम्ही माहिती द्या आम्ही कारवाई करतो अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे
veer nayak

Google Ad