बेंबळा प्रकल्पातील अधिग्रहणामध्ये असलेल्या वादा करिता होणार स्वतंत्र बैठक आ प्रतापदादा अडसड यांच्या प्रश्नावरून मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

बेंबळा प्रकल्पातील अधिग्रहणामध्ये असलेल्या वादा तथा न्यायालयामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक लावण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या आठवड्यात आ प्रतापदादा अडसड यांनी शैक्षणिक तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडले . बेंबळा प्रकल्पातील काही प्रकरणात व्हीआयडीसी ने उच्च न्यायालयात धाव घेतली त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी विधानसभेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी केली लगेचच मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देऊन बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले

शिक्षण विभागातील फाईल अडविणाऱ्यावर होणार कारवाई

शाळा महाविद्यालय मधून अनेक प्रस्ताव शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविंण्यात येतात सदर प्रस्ताव मुदतीच्या आत मंजूर होणे किंवा असलेल्या त्रुटी पूर्ण करणे महत्त्वाचे असते मात्र एक-दोन वर्ष होऊनही सदर प्रस्तावावर कोणतीच कारवाई होत नाही अशा शैक्षणिक फाईल आढळून आल्यावर कारवाई होणार का असा प्रश्न विधानसभेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी विचारताच शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या दिरंगाई व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खाजगी व शासकीय शाळा महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ प्रतापदादा अडसड यांनी विधानसभेत केली.

veer nayak

Google Ad