धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट पिंपळखुटा द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथील महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत दिनांक 30/11/2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2024/25 मध्ये प्रवेशित प्रथम वर्ष विद्यार्थिनीचे आरोग्य तपासणी शिबिर श्री संत बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय पिंपळकोटा येथे आयोजित करण्यात आले होते.
शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व श्री संत बुद्धाची महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हरार पण करून करण्यात आले यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री दीपक बोंद्रे महिला निवारण समितीचे अध्यक्ष कुमारी आर के भेंडे उपाध्यक्ष कुमारी देशमुख सचिव कुमारी एम एस लांडे कुमारी के जे जाधव कुमारी एन एस राऊत कुमारी व्ही एस बिजने कुमारी डी एस निंबाळकर कुमारी मौजे कुमारी काळे कुमारी एस एम उंबरकर व कुमारी एम एस काकडे इत्यादी समिती सदस्यांचे देखील सदर कार्यक्रमास मोलाचे योगदान प्राप्त झाले.
यावेळी श्री संत बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय पिंपळखुटा येथील वैद्यकीय अधिकारी ,डॉ.लीना चावके स्त्रीरोग तज्ञ व सौ प्रतीक्षा सोळंके रुग्णालय सेविका यांचे प्रमुख सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमांमध्ये मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व त्यांच्या मनातील प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशीत 48 मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी साक्षी कापसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कुमारी अंजली निवल हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नंदू शेठजी चव्हाण, एडवोकेट पी. यु. देशमुख, श्री राजूभाऊ भोगे तसेच सर्व व्यवस्थापन समिती पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. वृषाली देशमुख, श्री. प्रमोद नागपुरे, श्री पवन रुद्रकार, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.