नवी दिल्ली:
भारतीय जनता युवा मोर्चातील सहकारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री.मुरलीधरजी मोहोळ यांची दिल्ली येथे आमदार प्रतापदादा अडसड यांनी भेट घेतली. यावेळी बेलोरा अमरावती विमानतळा संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बेलोरा विमानतळ येथे उभारण्यात येणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या पायलट प्रशिक्षण केंद्रासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. आमदार प्रतापदादा अडसड यांनी स्थानिक ग्रामस्थांना रोजगार निर्मिती करिता प्रथमतः प्राधान्य देण्यात येण्यासंदर्भात यावेळी मागणी केली व सोबतच सहकार विभागातील विविध विषयासंदर्भात चर्चा केली. यावेळी श्री.मुरलीधरजी मोहोळ यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांचे स्वागत केले व युवा मोर्चातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
#बेलोरा_अमरावती #विमानतळ #amravati#Airport #बेलोरा #नांदगावखंडेश्वर#MurlidharMohal#Pratapadsad#बैठक
@MurlidharMohal
BJP Maharashtra