बीरव्याची मैफिल अन डफळी च्या निनादात रंगला ढाल महोत्सव – आ प्रतापदादा अडसड यांनी केले पूजन

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

चका चका चांदणी यो गोवारियो बिनो गायनसे कोटा भरे घरघर देवो आशिष गा….
अश्या बीरव्याची मैफिल अन डफळी च्या निनादात विदर्भातील साडे पाच हजार गावात आदिवासी गोंडगोवारीचा ढाल महोत्सव रंगला असून कावली येथे आ प्रतापदादा अडसड यांनी ढाल पूजन महोत्सवात सहभागी होऊन ढालीचे पूजन केले

आदिवासी गोंडगोवारी समाजाची संस्कृती म्हणजे ढाल पूजन उत्सव, आद्य धर्मगुरू पाहंदी पारी कुपार लींगो व माता जंगो रायताड यांच्या प्रतिकात आपल्या मृत पूर्वजांच्या रुपात दोन मुखी पुरुषाची व चार मुखी स्त्री च्या नावाची ढाल बनवून हिंदू धर्माच्या लक्ष्मी पूजेच्या दिवशी ही पूजा करण्यात आली आज पाड्व्याला
आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या युवकांनी व वडीलधारी व्यक्तींनी पायाला गुंघरु बांधुन आपले पारंपारिक आकर्षक नृत्य सादर केले

इतिहासाची परंपरा जपतेय आदिवासी गोंडगोवारी जमात

आद्य धर्मगुरू पाहंदी पारी कुपार लींगो व माता जंगो रायताड यांनी मिळून काट सावरी च्या झाडाखाली सगा सामाजिक व्यवस्था निर्माण करून कोया धर्माची स्थापना केली . व माता कली कंकली च्या मुलांना कोया धर्माची दीक्षा प्रधान केली होती. व जय सेवा चा मूलमंत्र नुसार समाजाची निस्वार्थ सेवाचा भाव मानत ठेऊन कार्य करावे. व समाज संरचना केली हाती. या मुळे समाजामध्ये एक नवी दिशा अर्पण केली. व सगा बिडार ( गोंदोला) परिवारात प्रेमभाव आणि एकमेकांच्या निस्वार्थ सेवा चा भाव निर्माण झाला. आणि गोवारी (कोपाल ) ही जमात गोंदोला परिवाराचा एक अंग आहे. म्हणून आदिवासी गोडगोवारी जमात ही काट सावरीच्याच झाडाखाली ढाल पूजा करून उभी करतात. यामुळे समाजात एक आंनदोउत्सव व शांतता नांदावी म्हणून ढालीच्या प्रतिकात जंगो आणि लिंगो यांच्या प्रतिकात आपल्या पूर्वजांच्या नावाने ढाल निर्माण करून पूजन व उत्सव सादरा केला जातो.

कावली मध्ये उत्सव
कावली येथे दिवसभर हा उत्सव साजरा करण्यात आला यात आ प्रतापदादा अडसड, माजी जी प बांधकाम सभापती रामदास निस्ताने भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव विलास बुटले, आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाचे राज्य संघटक मोहन राऊत विपिन दगडकर,विशाल खडसे, सरपंच जांभळे उपसरपंच संदीप इंगळे ,गजानन पाटील, गजानन गुरुभेले मधुकर नेवारे किशोर भोयर योगेश नेवारे प्रवीण चौधरी, शिवा लसवंते , अतुल नागोसे गजानन नेवारे निलेश नेवारे बाबाराव राऊत मुकीदा काळसर्फे, सुदाम ठाकरे अर्जुन सोनवणे यांच्यासह समाजातील शेकडो कार्यकर्ते सहभागी होते

आदिवासी गोडगोवारी समाजाच्या पाठीशी मी सदैव उभा – प्रतापदादा अडसड

तीनशे वर्षा पेक्षा अधिक काळापासून सुरू असलेला आदिवासी गोंडगोवारी जमातिचा ढाल पूजन उत्सव आजही सुरू आहे विदर्भातील साडेपाच हजार गावात हा उत्सव दोन दिवस साजरा करण्यात येतो मतदारसंघातील असलेल्या आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या सुखदुःखात मी सदैव पाठीशी उभा असल्याचे मत आमदार प्रतापदादा अडसड यांनी व्यक्त केले

veer nayak

Google Ad