चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चांदूर रेल्वेची विद्यार्थीनी हर्षदा राजीव शिवणकर ही छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सारथी शिष्यवृत्ती करिता पात्र झाली आहे. तर आर्थिक दुर्बल घटकातील वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेमध्ये याच शाळेची विद्यार्थिनी चैताली दिनेश काळे ही एनटी-सी प्रवर्गातून शिष्यवृत्ती करिता पात्र झाली आहे. त्यांना वर्ग ९ ते १२ वी पर्यंत प्रत्येक वर्षाला शासनाकडून शिष्यवृत्ती ची रक्कम प्रदान केल्या जाणार आहे.
बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एनएमएमएस, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा करिता नियमित वर्ग व मार्गदर्शन केल्या जात असते. तसेच शाळेमध्ये नाविन्यपूर्ण विविध उपक्रम घेतले जातात. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी नेहमीच प्राविण्य प्राप्त करून शाळेचे नाव उज्वल करीत असतात. शिष्यवृत्ती करिता पात्र झालेल्या हर्षदा राजीव शिवणकर व चैताली दिनेश काळे या दोन्ही विद्यार्थिनींचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच संस्थेची सर्व कार्यकारणी पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक अतुल ठाकरे, पर्यवेक्षक व्ही.टी. नवरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई-वडील व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना दिले आहे.