शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे पोळा. खांदशेकणी, पोळा, व तान्हा पोळा असा तीन दिवस चालणारा हा उत्सव शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. तळणी येथे सुध्धा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केल्या जातो. तळणी ग्रामपंचायत च्या वतीने लोकसहभाग घेऊन मागील तीन वर्षापासून उत्कृष्ट बैलजोडी व बैलजोडी सजावट स्पर्धा आयोजित केल्या जाते. स्पर्धेमध्ये श्री आकाश भोयर ( प्रथम पुरस्कार), श्री प्रमोद इरपते ( द्वितीय पुरस्कार), श्री नंदुभाऊ राठी ( तृतीय पुरस्कार), श्री संदीप जनोसकर ( प्रोत्साहन पर), श्री राजेन्द्र पवार ( प्रोत्साहन पर), श्री रामेश्वर डहाके ( प्रोत्साहन पर) यांना ग्रामपंचायत पदाधिकारी श्री विशाल भैसे , सौ मधुरीताई जानोस्कार, सौ प्रितिताई पाचारे, सौ सुवर्णताई कोल्हे, सौ अनीताताई पारखंदे, श्री सुधाकरराव लकडे, श्री अविनाश धुरवे यांनी पुरस्कार दिले व इतर सर्व बैलजोडी मालकांचा शेला व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
लोप पावलेली मखर पेटवायची पद्धत तळणी गावात आजही पाहायला मिळते. ज्या बैलावर मखर असतो त्या बैलाला पोळ्यात विशेष मान असतो. गावावर असणार अरिष्ट तो बैल स्वतः पेलतो अशी मान्यता आहे. तळणी येथील मखराचा मान श्री विजयराव भैसे यांच्या बैलाचा पारंपरिक रित्या आहे. ही परंपरा श्री विजयराव भैसे मोठ्या श्रध्देने आजही पार पाडतात.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी असणारा तान्हा पोळा च्या निमित्ताने लहान मुलांवर जणू बैलाप्रती प्रेम निर्माण करण्याचे एक बालसंस्कारच म्हणावं लागेल. तळणी येथे गावातील उपसरपंच विशाल भैसे मागील 10 वर्षापासून तान्हा पोळा भरवितात, ज्या मध्ये सर्व लहान मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केल्या जाते, व सर्व मुलांना खाऊ दिल्या जातो. तसेच मुलांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या बैलांना विशेष प्राधान्य देऊन त्यांना बक्षीस सुध्धा देण्यात येते.
बैलपोळा उत्सवाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी श्री आतिश मुंगभते, श्री अंकुश कोल्हे, माजी सरपंच वसंतराव परखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री विजयराव भैसे यांनी दरवर्षी गावातील बैलपोळा उत्सव सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने असाच शांततेत व उत्साहात पार पाडावा अशे आवाहन करून सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.