उपचार न मिळाल्याने असदपूर येथील बैलांचा तडफडून मृत्यू. निष्क्रिय डॉक्टरांवर कारवाईची मागणी..

0
63
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

असदपूर येथील शेतकरी सचिन अरुणराव ढवळे.अत्यंत कुषल शेतकरी असुन त्यांचें कडे ८० हजार रुपये कींमतीची भारदस्त बैलजोडी आहे.त्या पैकी एक राजा नावाचा बैल दिनांक २६ जुलै रोजी अचानक आजारी पडला.शनिवारी २७ जूलै रोजी दुपारी एक वाजता असदपूर येथील जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ आमझरे यांना माहिती दिली असता शनिवारची सुट्टी असल्याचे कारण सांगुन खाजगी पशुवैद्यकीय सेवक धानोरकर यांना उपचारासाठी पाठविण्यात आले.बैलावर उपचार करताच बैल नियंत्रणा बाहेर गेला डॉ आमझरे यांना माहिती देण्यात आली असता डॉ आमझरे यांनी बैलाला प्रत्येक्ष न तपासता रॅबीज ची लागन झाल्याचे घोषित केले. बैलाची प्रकृती बिघडत चालल्याने बैल मालक सचिन ढवळे यांनी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ ठाकुर यांना फोनवरुन असदपूरला येण्याचे प्राचारण केले व बैलाचे रक्त व लघवी तपासणी करण्यासाठी विनंती करत बैलाला तज्ञ डॉक्टरांच्या कडून उपचार देण्याची व आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली परंतु डॉ ठाकुर यांनी रविवारची सुट्टी असल्याचे कारण सांगत शेतकऱ्यांप्रति असंवेदनशीलता दाखवत शेतकऱ्याची मागणी धुडकावून लावली.अखेर २४ तासातच बैलांचा तडफडून मृत्यू झाला.त्यामुळे बैलाचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला हे निदान मात्र होऊ शकले नाही.घातक असलेल्या आजाराचे निदान झाले असते तर ईतर जनावरांचा उपचार करणे सोपे झाले असते.त्यामुळे जिल्हा पशुवैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांनी आपल्या जवळची संपूर्ण पुंजी शेतीत लावली असताना ऐन हंगामात शेतकऱ्यावर संकट कोसळे आहे.दुसरा बैल कसा घ्यायचा असा प्रश्न शेतकरी सचिन ढवळे यांच्या समोर उभा ठाकला आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव न ठेवणारे व सेवेप्रती निष्ठा न बाळगणाऱ्या संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाईची मागणी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांनी केली आहे.तसेच शेतकरी सचिन ढवळे यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे असेही तक्रारीत सांगितले आहे.

veer nayak

Google Ad