धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव- वडगाव रस्ता अवघ्या सहा महिन्यांतच खड्ड्यात गेला आहे. रामगाव नजीक असलेल्या चार गिट्टी क्रशर प्लांटमधून सुरू असलेल्या ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे.
घडामोडी:
ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यावर पाणी साचले; एसटी महामंडळाने या मार्गावरील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे रामगाव, वडगाव राजदी, वडगाव बासदी, दिपोरी या गावातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या शाळांमध्ये जाण्यास तीव्र अडचण निर्माण झाली.
वैतागलेल्या नागरिकांनी आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी वडगाव बाजदी बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान दोन ओव्हरलोड ट्रक नागरिकांनी रस्त्यावर थांबवून ठेवले.
प्रशासनाची प्रतिक्रिया:
या चक्काजाम आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून तहसीलदार आंदोलन स्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, चांदुर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
⚡ ग्रामस्थांची भूमिका:
“वारंवार निवेदन दिलं, तरी कारवाई नाही… रस्ता दुरुस्ती आणि ओव्हरलोड वाहतूक थांबवली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करू!”