चादूर रेल्वे प्रतिनिधी -:
चांदूर रेल्वे येथील छकुली सुरेश पिटेकर हीची उत्तराखंड मध्ये होऊ घातलेल्या ५०वी जुनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेत निवड झाली असून ८ते १२ जानेवारी ला ही महिला ची चमू रवाना होणार आहे याकरीता छकुलीची पिटेकर व चमूचे सर्व सस्तरावरून कौतुक होत आहे.
कुठल्याही खेळात जिद्द,चिकाटी, मेहनत व सराव आवश्यक असतो चादूर रेल्वे शहरात छकुली पिटेकर ही आझाद हिंद च्या कबड्डी मैदानावर दैनिक सराव करत ध्येय गाठण्यासाठी ती अतोनात प्रयत्न करत याच तिच्या जिद्द,चिकाटी, मेहनत च्या भरोशावर तीची उत्तराखंड मध्ये होऊ घातलेल्या ५०वी जुनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेत निवड झाली असून ही चमू येत्या ८ ते १२ जानेवारी ला उत्तराखंड मध्ये आपल्या खेळांचे प्रदर्शन करणारं चादूर रेल्वे शहरातून प्रथमच छकूलीची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत निवड झाल्यामुळे सर्वत्र स्तरावरून तीचे अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.