माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत जाहीर झालेल्या मानांकनात अमरावती विभागातून नगरपरिषद चांदूर रेल्वे ने तिसरा क्रमांक पटकावून 50 .00 लक्ष रुपये पारितोषिक रक्कम प्राप्त केले यात मुख्यधिकारी डॉ.विकास खंडारे आरोग्य निरीक्षक राहुल इमले लेखापाल संदीप माहुरे रचना सहायक आशिष कुकळकर ,कर निरीक्षक शारदा कावडे संगणक अभियंता योगेश वासनिक, पाणीपुरवठा अभियंता परिमल देशमुख, जितेंद्र करसे , विशाल सुरकार ,राजेश शिर्के अनंत वानखडे, पंकज इमले, मनीष कनोजे ,संगीता इमेल,संजय करसे शहर समन्वक पल्लवी जामोदकर व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. शहर स्वच्छता, पर्यावरण पूरक उपायोजना, वृक्षारोपण आणि हरित शाश्वतेबाबत केलेल्या कामगिरीमुळे मिळालेले हे बक्षीस संपूर्ण नगरपरिषदेचा आणि शहरातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नाचे यश प्राप्त आहे हा सन्मान भविष्यात आणखी प्रेरणादायी होईल आणि पर्यावरणाच्या दिशेने अधिकाधिक सकारात्मक पावले उचलण्यास प्रवृत्त करेल याची खात्री मुख्याधिकारी डॉ.विकास खंडारे यांनी दिली स्वच्छ चांदूर सुंदर चांदूर करण्यास व माजी वसुंधरा अभियान मध्ये नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व त्यांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश संपादन झाले आहे असेच नागरिकांनी सहकार्य करावे हे पारितोषिक नगरपालिकेचे सह संपूर्ण शहरवाशियांचे आहे त्याकरिता केलेल्या सहकार्याबद्दलआरोग्य निरीक्षक राहुल इमले यांनी शहर वाशियांचे आभार व्यक्त केले ..
Home आपला विदर्भ अमरावती माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जाहीर झालेल्या मानंकणात अमरावती विभागातून नगर परिषद...