धामणगाव रे येथे सुवर्णकार समाजातर्फे डॉ अर्चनाताई अडसड नगराध्यक्ष न. प. धामणगाव रे यांचा सत्कार आणि श्री संत शिरोमणी नरहरी महाराजाची पुण्यतिथी महोत्सव संपन्न

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दि. 04 फेब्रुवारी 2026 बुधवार ला तुळजाभवानी मंदिर तुळजाईनगर धामणगाव रे येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ अर्चनाताई अडसड यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या पुण्यतिथी महोत्सवात सर्वप्रथम श्री मनोजभाऊ तिनखेडे यांच्या घराजवळुन महाराजाची पालखी काढण्यात आली होती.

यामध्ये शारदा महिला भजन मंडळ वडगाव पांडे येथील भजन मंडळ सहभागी झाले होते यात जय राजेश येरपुडे यांनी नरहरी महाराजाची वेषभूषा केली होती. तसेच विठ्ठल, रुख्मिणी ची सुध्दा वेषभूषा करण्यात आली होती. नरहरी महाराज चौकात पालखी आल्यावर प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी ह. भ. प. नंदकिशोर महाराज हलमारे व संच पिंपळखुटा यांचे काल्याचे सुश्राव्य किर्तन झाले. कलशस्थापना सौ शारदाबाई डुमरे व अनंत डुमरे आणि श्री गजाननराव करुले यांच्या हस्ते करण्यात आली. तदनंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत सचिवपदी श्री शंकरराव कुर्वे व सल्लागार पदी अॅड तुषार मनोहरराव फाळे याची निवड झाल्याबद्दल आणि राज्यस्तरीय हॅडबाॅल स्पर्धेकरीता कु. ईशिका विनोदराव कावळे हिची निवड झाल्याबद्दल, नरहरी महाराज वेषभूषा केल्याबद्दल जय राजेश येरपुडे यांचा सत्कार नगराध्यक्ष डॉ अर्चनाताई अडसड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

नगर परीषद धामणगाव रे येथुन सेवानिवृत्त झाले ले श्री दिगांबरराव हिरूळकर याचा सुध्दा सत्कार करण्यात आला. तसेच 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री राजाभाऊ टेंभरे याचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.शेवटी समाजातील दिवंगत स्व. सौ. कुसुमताई शंकरराव कुर्वे, स्व. सुधाकरराव रोठे, स्व. बालाजी वझ्झरकर, स्व. ज्ञानेश्वरराव करुले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माळवी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष श्री गजाननराव करुले, सचिव श्री प्रविण खांडपासोळे, सुवर्णकार विकास महासंघाचे अध्यक्ष श्री विलासराव रोकडे, कार्याध्यक्ष श्री मनोहरराव फाळे, सचिव अनंत डुमरे, कोषाध्यक्ष श्री प्रशांत रोकडे, तसेच प्रा. अजय जी चिंचमलातपुरे, श्री कैलासभाऊ निबोळकर, श्री अशोकराव यावले, श्री विठ्ठलराव शेंदरकर, श्री अनिल राव ढोमणे, श्री सदाशिवराव रत्नपारखी, श्री प्रमोदराव उज्जनकर, श्री निलेश राव रोकडे, श्री ललीतभाऊ भटुरकर श्री मिलिंदभाऊ तिनखेडे, श्री मनोजभाऊ तिनखेडे, श्री किशोरभाऊ मांडळे, श्री रवीन्द्र जी डुमरे, श्री रवींद्र मांडळे, श्री विनोदराव बुटे, श्री राजुभाऊ बुटे, श्री गजाननराव बुटे, श्री प्रकाशराव करुले, श्री पवन बहाड, श्री जगदीशराव विंचूरकर, श्री अरुणराव विंचूरकर, श्री सदाशिवराव रत्नपारखी, श्री महेन्द्र हिरूळकर, श्री रवींद्रभाऊ टेंभरे, श्री पंकज बाळेकर,श्री राजुभाऊ रोकडे, श्रीकांतभाऊ वडनेरकर,श्री अशोकराव लोंधे, श्री सदाशिवराव निबोळकर, श्री दिलीपराव तरळकर,श्री राजेश येरपुडे, श्री रामभाऊजी कावळे, श्री शुभम कावळे, श्री हरीभाऊजी कावळे, श्री वसंतराव टेटे, श्री योगेश टेटे, श्री धनंजयराव रोकडे, श्री अॅड सुरेशराव फाळे, श्री विवेक भाऊ वझरकर, श्री प्रकाशराव पाटने,श्री ज्ञानेश्वरराव कुर्वे, श्री दिगांबरराव हिरूळकर, श्री मारोतराव फाळे, श्री गजाननराव फाळे, श्री राजाभाऊ टेंभरे, श्री राजुभाऊ ठोसर, श्री मनोहरराव फाळे आसेगांव,श्री भागवतजी ढोरे इ. समाजबांधव व मोठ्या प्रमाणात भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन व आभार अनंत डुमरे यांनी मानले. त्यानंतर महाप्रसाद आणि महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad