धामणगाव रेल्वे प्रज्योत पहाडे
धामणगाव रेल्वे येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अश्रीता नंदकुमार पहाडे या विध्यार्थीनिने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या मूड इंडिगो, आशियाती खंडातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव 2024, आयआयटी बॉम्बेच्या वतीने आयोजित. स्ट्रीट प्लेच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अखिल भारतीय प्रथम क्रमांक डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल पुणे टीमने पटकावला आहे. या टीम मध्ये आपल्या धामणगांव रेल्वे येथिल साधारण कुटुबांतली अश्रीता नंदकुमार पहाडे ही विध्यार्थीनि सहभागी झाली होती त्यामुळे तिचे सर्व स्तरावरून कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे. धामणगाव रेल्वे ग्रामवासियांनी तिच्या यशाबद्दल तिचे वआईवडील यांना खूप खूप शुभेच्छा दिल्यात.