आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : येथे जय नारायण गणेश राम जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मध्ये अचानक शॉट सर्किट मुळे आग लागल्याने लाखोचे नुकसान महेश गुड्डू शिवचंद्र चुडीवाल यांच्या JG जिनिंग फॅक्टरी ला 3 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याने चांगलीच खडबड उडाली होती आग लागल्याची माहिती मिळतात आर्वी नगरपरिषद येथील अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली तसेच अग्निशामक दलाद्वारे कापसाच्या गंजीला विजवण्याचे काम सुरू केले.
तीन वाजता पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते जवळपास चार-पाच तासानंतर गंजीला लागलेल्या आगीला आटोक्यात आनले त्यामध्ये जवळपास 15 ते 20 लाखाचे नुकसान झाल्याचे एक अंदाज आहे व काही प्रोसेसिंग मशनरी सुद्धा जळल्याचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस व संबंधित अधिकारी करीत आहे.