आर्वीतील रोडच्या व्दिभाजक संबंधी बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक लावण्यास विलंब का ?.

0
133
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्दिभाजक संबंधीत जन आक्रोश समितीला बैठक लावण्याचा दिला शब्द

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी,दि.२७:- शहराच्या मध्याभागातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या व्दिभाजकाचा तिढा सोडवीण्याकरीता जन आक्रोष समन्वय समितीचे सदस्य दशरथ जाधव यांनी राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना शुक्रवारी (ता.२७) निवेदन देवुन बैठक लावण्याकरीता केलेली विनंती मान्यकरुन बैठक लावण्याचा शब्द दिला. यावेळी आमदार सुमीत वानखेडे सुध्दा सोबत होते.

अमरावती जिल्ह्याच्या श्री क्षेत्र कौंडण्यपुर येथील वर्धा (वर्दनी) नदीला २११ मिटरची अखंड साडी अर्पण सोहळ्याकरीता ते आर्वी मार्गे जात होते. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे स्वागत केले. या संधीचा लाभ उचलत जन आक्रोश समितीचे समन्वय सदस्य दशरथ जाधव यांनी हे निवेदन दिले.

आर्वी-तळेगाव राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातुन जात आहे. या महामार्गाला सर्व्हीस मार्ग नाही शिवाय चार पदरी असलेला हा मार्ग ओलांडण्याकरीता भुयारी मार्ग सुध्दा नाही. या महामार्गाने शहर दोन भागात विभागला आहे. एकीकडे लोक वस्ती आहे तर, दुसऱ्याबाजुला शाळा, विध्यालय, बँका, कॉलेज, बस स्थानक असल्याने नागरिकांना अवागमन करण्याकरीता राष्ट्रीय महामार्गाचाच उपयोग करावा लागणार आहे. व्दिभाजक हा अर्ध्या मीटरचा राहीला तर नागरिकांना, बालकांना, वाहनचालकांना युटर्न, एल टर्न घेतांना व पुढील दोन लेन पार करतांना अडचण निर्माण होणार आहे. जर दिड मिटीरचा व्दिभाजक राहिला तर, व्दिभाजकाच्या मधल्या भागात ते सुरक्षीत उभे राहु शकतात आणी हिच अडचण ओळखुन जन आक्रोश समितीने दिड मिटरच्या व्दिभाजकाची मागणी केलेली आहे. याकरीता झाडांची अडचण असल्याचे अधिकारी सांगतात तर जन आक्रोश समितीने वकील सुध्दा नेमलेला आहे. एवढ करुन सुध्दा केंद्रीय महामार्ग निर्माण बांधकाम विभागाचे अधिकारी बोरकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही. रस्त्याचे काम बंद करुन ठेवल्यामुळे नागरीकांमध्ये निराश्य वातावरण निर्माण झालेले आहे. अधिकारी, आमदार, खासदार व जन आक्रोश समन्वय समिती सदस्यांची बैठक लावुन यावर तोडगा काढण्याची मागणी या निवेदनामधुन करण्यात आली आहे. निवेदनावरील मजकुर वाचुन महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाचुन बैठक लावण्याचा शब्द दिला आणी तशी निवेदनावर सुध्दा नोंद घेतली आहे.

प्रतिक्रिया

आम्ही आर्वीतील लोकप्रतिनिधींना भरघोस मतांनी निवडून दिले असून सुद्धा यांना आर्वीकर नागरिकांच्या समस्या लक्षात येत नसेल का? अपुऱ्या रोडमुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत असून आर्वीची हि गंभीर बाब लक्षात घेऊन व्दिभाजक हे अपघात टाळण्या करिता अर्ध्या मीटरच न करता दीड मीटरच करूण लवकर रोड संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून निर्णय घेऊन काम सुरू करायला लावायला पाहिजे. मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र एखादा अपघात झाल्यावरच लोकप्रतिनिधींना जाग येतो आणि कॅन्डल मार्च काढून मरणाऱ्यांच्या घरच्यांना सांत्वंन करून मरणाऱ्यांना फक्त भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचं काम करतात. लोकप्रतिनिधी वर निराश्य भावनेतून आर्वीतील नागरिक

जी. एम. गुल्हाने यांनी आपले तीव्र मत व्यक्त केले.

veer nayak

Google Ad