आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथील वली साहेब वार्ड परिसरातील पाटणे यांच्या घरामागे मैनाबाई जैन यांच्या घरासमोर दीनदहाडे हत्या आर्वी पोलिसांना माहिती मिळताच माैक्यावर जाऊन चौकशी केली असता निखिल बुरे (रा. हरदोली) नामक व्यक्तीने सलीम शहा सब्दर शहा (रा. संजय नगर, आर्वी) याची चाकूने वार करून केली हत्या सलीम हा रक्तबंबाड अवस्थेत वली साहेब वार्ड मस्का सात लाईन येथे पाटणी यांच्या घरामागे पडला
असल्याने पोलिसांनी ॲम्बुलन्स पाचारन करून उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता प्रायमरी उपचार करत असतानाच सलीम ने दम सोडला पोलीस स्टेशनला मुख्य फिर्यादी कडून हतेच्या प्रकरणाची सा. 6 वाजे पर्यंत कोणतीही तक्रार आली नसून बातमी बनवेपर्यंत गुन्हा दाखल व्हायचा होता. पुढील तपास व चौकशी पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर ढोले व पोलीस निरीक्षक सतीश देहणकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.