आर्वी-तळेगाव रोडवर जीव वाचवु की गड्डा अशी दैनंदिन झाली अवस्था. मुख्य मार्गावर आर्वी शहरात अनेक घटना मात्र प्रशासनाची कायमची चुपी.

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ 

आर्वी : आर्वी शहरातुन नॅशनल हायवे गेला असुन रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे पाहता पाहता अनेक अपघाती मृत्यू घटना उघड्या डोळ्यासमोर घडल्या आहे तरी सुद्धा प्रशासन व राजकीय नेते गांधारीच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहीतरी थातूरमातूर प्रशासन कारवाई करत आहे. मात्र प्रशासनाकडून अतिक्रमण वर कारवाई तर नाहीच परंतु नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिने सर्विस रोड सुद्धा नाही. आर्वी तळेगाव रोडवर बस स्थानकाला असलेल्या वर्दळ असणाऱ्या रोडच्या मध्यभागी मोठ-मोठे खड्डे पडले असून ते सुद्धा अद्यापही बुजवण्यात आलेले नाही. मग आम्ही जीव वाचवायचा कसे शहरात असे अनेक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे व शहरात हाेत असलेल्या नागरिकांची प्रशासनावर व राजकीय नेत्यांवर टीकात्मक चर्चा चर्चेला चांगलेच उधान आलेले आहे. तरीही प्रशासनाला व राजकीय नेत्यांना जाग नाही.

आई-वडिलांना ; शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा थेट सवाल?

” आई-बाबा आम्ही या रस्त्याने जायचे कसे मध्यभागी रोडला मोठमोठे खड्डे पडलेले आहे. व दोन्ही बाजूने रोडच्या कडेला अतिक्रमण असल्यामुळे सर्विस रोड नसल्याने रस्त्यावरच मर्जीप्रमाणे गाड्या उभ्या करून देत असतात अशात प्रशासन सुद्धा थातूरमातूर कारवाई करून मुंग गिळून बसलेल दिसत आहे. अशा निष्क्रिय प्रशासनामुळे इतर वाहतुकीस चांगलीच अडचण निर्माण होत आहे. त्यातच आम्हाला या रस्त्याने जात असतांना जीव मुठीत घेऊन मोटर सायकलने जावं लागते मग आम्ही ट्युशन व शाळा कॉलेजला जायचं कसं?.

 

मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर मोठ-मोठ्या खड्ड्यामुळे वाहतुकीला व विद्यार्थ्यांना करावा लागतो अडचणीचा सामना

” आर्वी शहरातून नॅशनल हायवे रस्ता गेला असून त्या रस्त्याला सर्विस रोड नाही. आर्वी-तळेगाव व आर्वी-देऊरवाडा याच रस्त्यावर आतापर्यंत कित्येक निष्पाप जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या असून अद्यापही प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. न्याय मागव तरी कुणाला मुलांनी केलेल्या प्रश्नाच उत्तर द्यायचं कसं अनेक नागरिकांच्या समोर माेठा प्रश्न निर्माण झालेला आहे. 

घटना घडल्या की प्रशासनाची थातूरमातूर कारवाई दडपण कोणाचे ?..

” मागील वर्षी असाच एक निष्पाप मुलीचा अपघाती मृत्यू झाला हाेता. त्या मृत्युने प्रशासनही जागं झालं हाेत. मात्र नॅशनल हायवे रस्त्यावरच अतिक्रमण न काढता शिवाजी चौक ते गांधी चौकातल्या रस्त्यावरचे व आतील नेहरू मार्केट,इंदिरा चौक आत मधले तातडीने अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून ती होत असलेली अतिक्रमण कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नॅशनल हायवे ला सर्विस रोड नसल्याने रोड अपुरा पडत आहे तरी सुद्धा अजूनही भर रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही. व सर्विस रोड नसल्याने आर्वी देऊरवाडा रोडवर पुन्हा एका निष्पाप मुलीचा जीव गेला हाेता तरीसुद्धा प्रशासनाला जाग नाही. अखेर याला जबाबदार कोण?..

मुख्य रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणावर प्रशासनाचा का? लागतो ब्रेक…..!

” नियमबाह्य येत असलेले अतिक्रमण वाचवण्याच्या प्रयत्नातून काही राजकीय नेते अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन आपल राजकारण टिकून ठेवण्याकरिता किंवा वैयक्तिक संबंध जपण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? शहरातल्या मुख्य रोडवरच्या वाढत्या अतिक्रमणावर प्रशासन योग्य निर्णय घेतील का? अशा आर्वी शहरातील नागरिकांमध्ये विविध ठिकाणी चर्चा होत आहे.

 

२०२५ लोटून सुद्धा आर्वी-तळेगाव रोड पूर्णत्वास गेलेला नाही. मग बायपास केव्हा होणार? शहरातून गेलेल्या नॅशनल हायवे रस्त्याचे काम बांधकाम विभागाने पोलीस प्रोटेक्शन घेऊन मनमर्जीप्रमाणे डिव्हायडर अरुंद करून सुद्धा अद्यापही नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्विस रोड केलाला नाही. तसेच आर्वी-देऊरवाडा रोड लहान करून रोडच्या दोन्ही साईडला अतिक्रमण असल्याने सायकल व पायदळ चालण्या करिता नागरिकांना सुरक्षित रस्ता नाही. मुख्य मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तरीसुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे.

पंकज गाेडबाेले (सामाजिक कार्यकर्ते)

 

आर्वी-तळेगाव रोडवर शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालय असल्याने विद्यार्थ्यांना व या रस्त्याने वावरत असणाऱ्या नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिने सर्विस रोड पाहीजे आहे. या अपुऱ्या सुविधेकडे वाढत्या वाहतुकीच्या प्रश्नावर प्रशासनाने व स्थानिक आमदार खासदारांनी अतिशय गांभीर्यान लक्ष देण्याची गरज आहे.

 

प्रा. डॉ. सुधाकर भुयार

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आर्वी शहर अध्यक्ष)

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad