आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : दि. 19/02/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विविध मान्यवरांच्या हस्ते माला अर्पण करण्यात आले तसेच खासदार अमरभाऊ काळे व आमदार सुमितभाऊ वानखडे यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गांधी चौक, गुरुनानक धर्मशाळा, विठ्ठल वार्ड, जुने न्यायालय व रेस्ट हाऊस पर्यंत महाराजांच्या जीवनावर अनुसरीत विविध झाक्या सजावट करून मोठ्या जल्लोषाने ढोल ताशे व डीजेंच्या गजरात जय भवानी जय शिवाजी महाराजांच्या अशा घोषणा देऊन शिवजयंती महोत्सव शहरातून आनंदमय वातावरणात रॅली काढून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध ठिकाणी मुस्लिम समाजांनी नाश्त्याचे स्टॉल लावून शिवभक्तांचे शिवमय दुपट्टे टाकून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.