मन भावन ब्लास्टर क्रीडा मंडळचा विक्रम कायम धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे पटकावले प्रथम बक्षीस
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : सामाजिक कार्यात व क्रीडा क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणार मन भावन क्रीडा मंडळच्या टीमनी धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे प्रथम बक्षीस पटकावुन विक्रम कायम ठेवला प्रायोजक मन भावन ब्लास्टर आर्वी पॉलीटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ता. शिरपूर जि. धुळे 23/02/2025 ला के व्ही पी एस इन्स्टिट्यूट शिरपूर येथे झालेल्या हॉलीबॉल टूर्नामेंट मॅचेस मध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोन मधील विविध ठिकाणच्या टीम आल्या होत्या विदर्भातील एच झोनमधील आर्वीच्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मन भावन ब्लास्टर आर्वी टु मुंबई टीम सोबत फायनल खेळून प्रथम बक्षीस पटकावले असून मन भावन क्रीडा मंडळ आर्वीच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी गजू शिंगाने शेख अन्सार, सुधीर जाचक, अमित शिंगाने, रामू राठी,नरेश गेडाम, उपस्थित होते.