आर्वी पोलिसांच्या प्रयत्नाला यश लापता असलेल्या किरण गोरेचा वर्धा नदीत सापडला मृतदेह

0
182
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी,दि.६:- गुरुवार (दि.४) पासुन घरुन लापता असलेल्या किरण गोरे (४५ वर्ष) हिचा पोलीसांच्या महत्त प्रयासाने अखेर वर्धा नदीच्या पात्रात देऊरवाडा लगत मृत देह अखेर दोन दिवसा नंतर शनिवारी (ता.६) ला हाती लागला असुन तिने नदीत उडी घेवुन आत्महत्या केली असावी असा प्राथमीक अंदाज आहे.

गुरुवारी (दि.४) रात्रीच्या सुमारास व्हाट्सअप टेट्स वर आत्महत्या करीत असल्याचा संदेश टाकुन ॲक्टीव्हाने घरुन निघुन गेली होती. याची माहिती तिच्या मानलेल्या भावाने दुसरे दिवसी शुक्रवारी (दि.५) येथील पोलीसांत दिली. ठाणेदार सतिश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी शोध घेणे सुरू केला. तिची अक्टीव्हा स्कुटर कौंडण्यपुर मार्गावर देऊरवाडा नजीक दिसुन आल्यामुळे तिने नदीत उडी घेवुन आत्महत्या केली असावी असा प्राथमीक अंदाज लावुन पोलीसांनी एन.डी.आर. पथकाच्या माध्यमातुन तपास सुरू केला. अखेर शनिवारी (दि.६) दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिचा मृत देह हाती लागला.

या घटनेची प्राथमिक माहिती प्रकाश घारपुरे यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी मर्ग दाखल केला असुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू केला आहे.

उपविभागीय पोलीस अधिnकारी चंद्रशेखर ढोले व ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलीमा बाबर, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, संदिप चव्हाण, अमोल गोरडे, दिगांबर रुईकर, अमर हजारे, अंकुश निचत, सुरज बावरी, निलेश करडे, आदिं या शोध मोहीमेत सहभागी होते.

veer nayak

Google Ad