विरोधी पक्षाकडून भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथील नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळी प्रचाराला चांगलाच पेठ धरलेला आहे. टक्कर मात्र सत्ताधारी व तुल्यबळ दोनच पक्षांमध्ये होत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु भाजपचे केंद्रात व राज्यात सरकार असल्याने भाजपाला एक हाती सत्ता मिळेल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. भाजप पक्षाच्या विरुद्ध तुल्यबळ पक्ष म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चुरशीची लढाई होईल असे वाटत होते. परंतु आर्वीतील स्थानिक काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ही युती स्थापन करण्यात आली असून नगराध्यक्ष पदाकरिता अंजली जगताप तसेच नगरसेवक पदाकरिता प्रियंका भीमके, पंकज वाघमारे, प्रीती सुरवाडे, देवेंद्र खंडाते या पाच लोकांना काँग्रेसचे एबी फॉर्म देण्यात येऊन केलेल्या युतीमध्ये काँग्रेसचे पाचही नाव काँग्रेसच्या ठरवलेल्या लिस्टमध्ये नव्हते मग हे नाव काँग्रेसच्या लिस्टमध्ये आले कुठून आणि यांना उमेदवारी करिता पक्षाचा एबी फॉर्म दिला कोणी हा देखील विषय नागरिकांमध्ये चर्चेचा झालेला आहे. पूर्व काँग्रेसच्या नेत्यांनी संगनमत करून ही युती चुप्या मार्गाने केली असल्याने ही युती नागरिकांना मान्य नसल्याचे चर्चेतुन दिसून येत आहे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून 25 नगरसेवक पदाकरिता व 1 नगराध्यक्ष पदाकरिता या निवडणुकीच्या रिंगणात इच्छुक उमेदवार उतरले होते. मात्र काही पूर्व काँग्रेसच्या नेत्यांनी नाते संबंधाचा फायदा घेत वेळेवर युती स्थापन करून हा डाव रचल्याने सर्व इच्छुक उमेदवार एबी फॉर्म वेळेपर्यंत न मिळाल्यामुळे या निवडणुकीपासून वंचित राहले त्याचाच एक विरोध म्हणून त्याचा फायदा भाजपला होईल का? अशी देखील शहरात चर्चा विविध ठिकाणी रंगत आहे. भाजपच्या प्रचार रॅलीतून व कॉर्नर मिटींगला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याने विविध ठिकाणी होत असलेल्या चर्चेनुसार भाजपलाच एक हाती सत्ता मिळेल असाही एक अंदाज वर्तविला जात आहे. जिकडे तिकडे भाजपमय वातावरण दिसत असल्याने विरोधकांचे चांगलेच धाबे दनानले आहे. भाजप पक्षामध्ये फुट निर्माण करून भाजप पक्षातीलच काही लोकांना प्रलोभन देऊन हातखंडे विरोधी पक्ष वापरत असल्याचे चित्रही पहायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये विजयाचा कल कोणत्या पक्षाकडे राहील याच्याकडे सर्व आर्वीकर नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.














