आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी येथे गृह अर्थशास्त्र विभागाद्वारे आंतर महाविद्यालयीन मोदक स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्यातील अकरा सीनियर कॉलेज आणि 3 जुनियर कॉलेजच्या विद्यार्थिनीं अशा एकूण 127 विद्यार्थिनींनी आज मोदक स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यामध्ये यशवंत महाविद्यालय सेलू येथील कु. पूजा डोंगरे यांनी प्रथम क्रमांक तर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आर्वी येथील कु. शुभांगी दूधकवरे हिने द्वितीय क्रमांक तर महिला महाविद्यालय, आर्वी येथील कु.प्राची फाले हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनीनी महाराष्ट्रातील पाककलेतील आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के सर उपस्थित होते. तर मोदक स्पर्धेचे परीक्षण कृषक कन्या विद्यालय आर्वी येथील मुख्याध्यापिका सौ. अनघा कदम, डॉ. सुषमा बोन्डे, सौ. वैशाली सोनटक्के, सौ.मानसी होरे, सौ. कांचन भुयार यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन गृह अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रोहिणी मेश्राम, डॉ. ज्योती देशमुख, प्रा. योगिता खेकाळे, प्रा. अमर भोगे, प्रा. हर्षिता त्रिवेदी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.