मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी दिल्या शुभेच्छा. दिव्यांगाना तीन चाकी सायकलचे वितरण
धामणगाव रेल्वे,
विपरीत परिस्थिती आणीबाणीचा काळात मागील सात दशक संघर्ष करून विदर्भात अरुणभाऊ अडसड यांनी शिस्तबद्ध कार्यकर्ते घडविले त्यांच्यामुळे आज भाजपला चांगले दिवस आले असून त्यांच्या पराकाष्टेने त्याकाळी विदर्भात कमळ फुलण्यास सुरूवात झाली असल्याचा संदेश देत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या
केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यातील मंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या
विदर्भाची बुलंद आवाज भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुणभाऊ अडसड यांचा वाढदिवस तिन्ही तालुक्यात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला मंगरूळ दस्तगीर येथे महाआरती, चांदूर रेल्वे येथे रक्तदान शिबिर, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला धामणगाव रेल्वे येथील अरूनोदय निवासस्थानी अरुणभाऊ अडसड व त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभाताई अडसड यांना भाजपा महिला आघाडीच्या वतीने प्रथम औक्षवंत करण्यात आले त्यानंतर दिवसभर राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच रीघ लावली होती जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना सरपंच, उपसरपंच, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी एकच गर्दी केली होती
केंद्रातील मंत्र्यांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव, गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळाच्या सर्वच मंत्र्यांनी व राज्यातील आमदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या
दिव्यांगाना तीन चाकी सायकलचे वितरण
तालुक्यातील दिव्यांगांना गौण खनिज अंतर्गत प्राप्त निधीतून तीन चाकी सायकलचे वितरण विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुणभाऊ अडसड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप अडसड, तहसीलदार अभय घोरपडे प स चे गटविकास अधिकारी योगेश वानखडे, विस्तार अधिकारी निलेश वाघ तसेच भाजपा पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती