आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांनी घेतला लाभ आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया औषधी वाटप

0
119
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी,प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : बोरगाव हातला येथील बुद्ध विहारात दिनांक 5/3/ 2025 रोजी ज्ञानेश्वर राठोड गोरसेना विभागीय अध्यक्ष नागपुर व डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल व हॉस्पिटल अमरावती च्या डॉक्टर राधेश्याम राठी व टीम यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये हृदयरोग तपासणी, गरोदर मातांची तपासणी, अस्थिरोग तपासणी, नेत्र तपासणी व किडनी रोग तपासणी करण्यात आले .या शिबिरा मध्ये ३०० गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये काही रुग्णांची तपासणी झाल्यावर पुढील उपचार व शस्त्रक्रिया साठी अमरावती हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले.शिबिरा मध्ये बोरगाव हातला, पाचेगाव ,दहेगाव मुस्तफा ,कवाडी, गव्हाणखेडी ,पिंपरी, पारगोठाण, धनोडी ,सावंगी पोड आदी गावातील लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपले आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. बोरगाव हातला येथे आरोग्य शिबिरात प्रमुख अतिथी संजय जाधव ,राजू कुकडे, पुरुषोत्तम ठाकरे ,सूर्यप्रकाश भट्टड, मनीष उभाड ,गोपाल मरस्कोल्हे ,मोहम्मद जमील शेख ,नितीन आष्टीकर, दर्पण टोकसे, रवी खंडारे, यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले , प्रकाश भट्टड ,आनंद वंजारी ,महेंद्र श्रीरामे, अश्विनीताई शिरपूरकर ,गोविंद शिरपूरकर ,अविभाऊ देशमुख, राजाभाऊ नाखले ,रज्जाक अली, प्रभुजी श्रीराम, सोमेश्वर भगत ,राजू वासनिक,ओमप्रकाश कडू, विलास बनसोड, निखिल राठोड, सचिन राठोड ,आकाश दुर्वे ,प्रफुल राठोड ,नागोराव कालोकार, पिंटू साठे, लखन दाबणे ,मोटघरे कैलास कापसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता गोरसेनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

veer nayak

Google Ad