ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
32
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 09 : ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना मानधन देण्यासाठी राजश्री शाहू महाराज योजना लागू आहे. यासाठी दि. 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजनेचा सुधारीत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यात आता योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग हे राहणार आहेत. कलाकारांची मानधन योजनेसाठी निवड करताना त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. त्यासाठी mahakalasanman.org यावर कलाकारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. सर्व वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांनी मानधन योजनेचे अर्ज दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी भरावेत, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत बालासाहेब बायस यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad