अमरावती, दि. 12 : वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राची वैधता संपली असल्यास, अशा वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र लवकरात लवकर नुतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये शुल्क आकारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. याबाबत ऑटोरिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन धारकांच्या संघटनेकडून विलंब शुल्क माफ करण्याबाबत निवेदन दिले होते. वाहनधारक, विविध संघटना यांच्या निवेदनांचा व मागणीचा सहानूभूतीपूर्वक विचार करून शासनाने शुल्क माफीच्या प्रस्तावास मान्यता देऊन 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे.