अंजनसिंगीत भाकपाचे पक्ष शताब्दी वर्ष समारंभ व तालुका अधिवेशन संपन्न

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंजनसिंगी येथील कान्होजी बाबा सभागृहामध्ये दिनांक 25 मार्च 2025 ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धामणगाव रेल्वे तालुका अधिवेशन व पक्ष शताब्दी वर्ष समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक कॉम्रेड हरिभाऊ टिकले, उद्घाटक कॉम्रेड प्रसेन्नजीत तेलंग प्रगतिशील लेखक संघ, तर मार्गदर्शक म्हणून कॉम्रेड तुकारामजी भस्मे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य भाकपा, कॉ. सुनील मेटकर जिल्हा सचिव भाकपा, प्रमुख कॉम्रेड सुनील घटाळे, रूपाली गायकवाड सरपंच, अवधूचे उपसरपंच, सतीश थोटे अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी, डॉक्टर विक्रमसिंग सुरजुसे मंगेश डाफ, मारोतराव काळे हे होते कार्यक्रमाच्या परंपरेनुसार सर्वप्रथम पक्षाचा झेंडा कार्यक्रमाचे उद्घाटन यांच्या हस्ते फडकविण्यात आला.

याच कार्यक्रमाच्या दरम्यान गावातील वयोवृद्ध पक्षाचे जेष्ठ साठ कार्यकर्त्यांचा मान्यवराच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस विश्वास कांबळे यांनी केले जेवणानंतर दुसऱ्या सत्रामध्ये त्रिवासी कामकाजाची मांडणी करून प्रमुख मार्गदर्शक तुकाराम भस्मे त्यांनी देशाच्या सद्यस्थितीवर, बेरोजगारी, शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक, शेतकऱ्याची कर्जमाफी इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर धामणगाव रेल्वे तालुका भाकपा पक्ष कार्यकारिणी कॉम्रेडश्रीकृष्ण सडमाके तालुका सचिव, त्यानंतर सायंकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या मनोरंजन हॉलमध्ये शाहीर धम्मा खडसे यांच्या क्रांतिकारी गीताचा जलसा साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेकडो कॉमेट उपस्थित होते

veer nayak

Google Ad