अमरावती शहरांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती व जिल्हा हिवताप कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यामानाने सार्वत्रिक गप्पी मासे धडक मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला.

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती : ही मोहीम डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती, डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वत्रिक गप्पी मासे धडक मोहीम शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथे राबविण्यात आली. याप्रसंगी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती, डॉ. गुल्हाने, डॉ. रुपेश खडसे, साथरोग अधिकारी महानगरपालिका अमरावती, डॉ.अश्विनी खडसे, स्त्री वैद्यकीय अधिकारी शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन, श्रीमती कल्पना दुधीयाळ, वरिष्ठ लेखाधिकारी महानगरपालिका अमरावती व श्री हैदर अली शहर आरोग्य निरीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी भूषवले याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हैदर अली शहर आरोग्य निरीक्षक यांनी शहरातील डास उत्पत्ती स्थानाची माहिती देऊन गप्पी मासे विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. याप्रसंगी डॉ. गुल्हाने यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना गप्पी मासे धडक मोहीम अंतर्गत आपला कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना स्थानिक नागरिकांना याचे महत्त्व पटवून देण्याविषयी मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर अश्विनी खडसे यांनी डेंगू मलेरिया चिकनगुनिया तसेच इतर कीटकजन्य आजार यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गप्पी मासे धडक मोहीम ही एक डासअळींना प्रतिबंध घालण्यासाठी अतिउत्तम उपाय योजना असल्याचे सांगितले. तसेच डॉक्टर रुपेश खडसे साथरोग अधिकारी यांनी ऑपरेशन सिंदूर ज्याप्रमाणे सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी राबविले त्याचप्रमाणे प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडून तेथील डास उत्पत्ती स्थान नष्ट होईल अशा प्रकारचे उपमा देऊन कर्मचाऱ्यांमध्ये जोश भरला

तसेच त्यांनी गप्पी माशांविषयी संपूर्ण माहिती स्थानिक नागरिकांपर्यंत तसेच कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती यांनी सार्वत्रिक गप्पी मासे पैदास केंद्र या कार्यक्रमाची प्रशंसा करून गप्पी मासे डासउत्पत्ती स्थानांमध्ये सोडण्यामागचे महत्व स्थानिक नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना समजून सांगितले. गप्पी मासांमुळे कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची आणि होत नसून ते जैविक नियंत्रणाखाली येत असल्यामुळे तेथील डास उत्पत्ती स्थान नष्ट होण्यासाठी मदत होते आणि आपले कार्यक्षेत्र अबाधित राहते याविषयी मार्गदर्शन केले तसेच डेंगू मलेरिया चिकन गुनिया तसेच इतर कीटकजन्य आजार याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आजची धडक मोहीम प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात यावी याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शित केले. श्री हैदर अली आरोग्य निरीक्षक यांनी स्थानिक नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी यांना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कीटकजन्य परिस्थितीशी उद्भवणाऱ्या समस्यांविषयी मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग अधिकारी, डॉक्टर गुल्हाने, डॉक्टर अश्विनी खडसे, श्रीमती कल्पना दुधाळकर, श्री हैदर अली, आरोग्य निरीक्षक यांनी डास उत्पत्तीस्थानांमध्ये गप्पी मासे सोडून सार्वत्रिक गप्पी मासे धडक मोहीम या कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी शहरातील विविध कार्यक्षेत्रामध्ये डास उत्पत्तिस्थानांवर गप्पी मासे सोडण्यात आली आणि नागरिकांना कीटकजन्य आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच गप्पी मासे कशा पद्धतीने उपयुक्त ठरतात याविषयी माहिती देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणारी भांडी, रांजण, माठ, फुलदाणी, कुलर, फ्रीजच्या मागे ट्रे, घराभोवतालचे डबकी, तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाडावा याविषयी नागरिकांना सांगण्यात आले. संडासच्या गॅस पाईपला जाडी किंवा नायलॉनची पिशवी बसवावी, संध्याकाळी पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत, मच्छरदाणी व खिडकी, दारांना जाळीचा वापर करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी श्री दिपंकर बरडे आरोग्य सेवक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच स्थानिक नागरिकांना व कर्मचाऱ्यांना गप्पी माशांविषयी शपथ दिली. श्री शरद सावळे, शशांक जयस्वाल आरोग्य सेवक यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री बबन खंडारे आरोग्य सेवक यांनी केले. याप्रसंगी या कार्यक्रमाला शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथील सर्व आरोग्य कर्मचारी, तसेच शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी व आशाताई उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग लाभला. गप्पी मासे पाळा, डेंगू मलेरिया टाळा या घोषवाक्याने सार्वत्रिक गप्पी मासे धडक मोहीम कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

veer nayak

Google Ad