घुईखेड येथे १५ मे पासून सर्वांगीण बालविकास वारकरी सुसंस्कार नि:शुल्क शिबीर. श्री संत बेंडोजी महाराज संस्थान, तिर्थक्षेत्र घुईखेडचे आयोजन. १० वर्षांवरील इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

0
110
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री संत बेंडोजी महाराज संस्थान, तिर्थक्षेत्र घुईखेडतर्फे १५ मे पासून ५ जुनपर्यंत संस्थानमध्ये सर्वांगीण बालविकास वारकरी सुसंस्कार नि:शुल्क निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबीराचा शुभारंभ १५ मे रोजी होणार आहे. सदर शिबीरामध्ये किर्तन प्रशिक्षण, गायन, मृदंग वादन, गाथा, ज्ञानेश्वरी व गीता अभ्यास, सामान्य ज्ञान, विविध खेळ व योगासने यांचे धडे दिले जाणार आहे. शिबीर संयोजक ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज तायडे (श्री गुरू शांतीधाम आश्रम, मडाखेड) हो असुन नियोजक ह.भ.प. केशवानंदजी महाराज चवरे (शास्त्री), चिंचोली हे आहे. 

या शिबीरादरम्यान श्री. संत गणेश महाराज (मठाधिपती मणिराम म.सं. बग्गी), ह.भ.प. वासुदेव महाराज (मोहन म. संस्थान, दाभा), ह.भ.प. तुळसीराम महाराज (मोहन म. संस्थान, दाभा), ह.भ.प. मधुकर महाराज पाचपुते, ह.भ.प. सुरेश महाराज रोकडे, आचार्य ह.भ.प. सुरेश महाराज गायकवाड (परभण), विदर्भरत्न ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या भेटी होणार आहे. तर प्रशिक्षक म्हणून ह.भ.प. सारंग महाराज ढोरे, ह.भ.प. प्रथमेश महाराज गिरी, ह.भ.प. नितीन महाराज नेणे, ह.भ.प. प्रितम महाराज तायडे, ह.भ.प. रोहित महाराज वाखेकर हे राहणार आहे. तसेच मृदुंगाचार्य ह.भ.प. शेखर महाराज मगर (परभणी), ह.भ.प. सुरज महाराज कूयटे, ह.भ.प. बालाजी महाराज जाधव, ह.भ.प. रामकृष्ण महाराज भगवत, ह.भ.प. भुषण महाराज गिरी, ह.भ.प. अक्षय महाराज हरणे, ह.भ.प. हरीभाउ झाडे (सौजना), ह.भ.प. भगवत महाराज पाटिल मडाखेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिबारात ह.भ.प. विश्वेश्वरराव गावंडे (विणेकरी बे.म.सं.), पांडुरंग भोयर, जयकृष्णा येवले, ज्ञानेश्वरराव इंगोले, काशिनाथजी लाड, महेंद्रा काकडे, अनुराग वानखडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

सदर शिबीरात शिबीरार्थ्यांकरिता राहण्याची उत्तम व्यवस्था, सकाळी चहा व नास्ता, दोन वेळ जेवन व दुपारी चहा तसेच आरोग्य तपासणीकरीता डॉक्टर आदी सर्व सोईसुविधा नि:शुल्क उपलब्ध राहणार आहे. समारोपीय काल्याचे किर्तन ५ जुन रोजी सकाळी ९ ते ११ वाजता ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज तायडे (श्री गुरू शांतीधाम आश्रम, मडाखेड) यांच्या हस्ते होऊन शिबीराचा समारोप हाईल. तरी या नि:शुल्क शिबीरामध्ये प्रवेश नोंदणीकरीता चांदूर रेल्वे तालुक्यासह जिल्ह्यातील व बाहेरील इच्छुक १० वर्षांवरील विद्यार्थ्यांनी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन आयोजक संस्थानचे नंदूभाऊ काकडे (९५२७९००४२६), शिबीर प्रमुख ह.भ.प. प्रथमेश महाराज गिरी (९११२९५०९६२), संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर व इतरांनी केले आहे.

veer nayak

Google Ad