प्रतिनिधी-
दर्यापूर तालुक्यातील युवा उद्योजक तथा धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेले अजय ब्रदिया वसु यांची आज अमरावती जिल्हा काँग्रेस पक्षाच्या सहसचिव पदी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली अजय ब्रदिया हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी आहेत प्रतिष्ठित युवा उद्योजक म्हणून त्यांची प्रचिती तालुक्यासह जिल्हाभरात आहे त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत सर्वसामान्यांचे आशीर्वाद पदरी पाडले तर गरजवंतांच्या हाकेला नेहमी साथ देत त्यांना आज थेट जिल्ह्याच्या कार्यकारणीत स्थान मिळाले आहे पक्षप्रवेश करीत असताना त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही यथायोग्यतेने पार पाडू असे आश्वासित केले यावेळी अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे,काँग्रेस शहरअध्यक्ष आतिष शिरभाते, अमोल जाधव, गौरव टोळे, सूरज धर्माळे, सह जिल्हाभरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.