5 ऑक्टोंबर शनिवार रोजी शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर पूर्वी बहुजन समाज पार्टीचे आणि सध्या शिवसेना उभाठा गटात आलेले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अभिजीत ढेपे पाटील यांनी होऊ घातलेली विधानसभा निवडणुक लक्षात घेत मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचे प्रयत्न केले, याकरिता त्यांनी मा, खासदार अरविंद सावंत यांची चांदूर शहरात सभा ठेवण्यात आली, त्याकरिता संपूर्ण शहरातील रस्त्यावर मुख्य अतिथी खासदार अरविंद सावंत यांचे बॅनर पोस्टर लावण्यात आले,
मुख्य पाहुण्यांचे भाषण ऐकण्याकरिता धामणगाव मतदार संघातील तिन्ही तालुके नांदगाव खंडेश्वर चांदुर रेल्वे आणि धामणगाव मधून मोठ्या प्रमाणात जनता सुद्धा आली, याकरिता चांदुर रेल्वे शहरातून ढोल ताशे आणि डीजे वाजवून भव्य रॅली काढण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात आले होते, परंतु मुख्य वक्ते खासदार अरविंद सावंत यांची तब्येत बरोबर नसल्याकारणाने ते या सभेला येऊ शकले नाही,यावेळी मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभेत उपस्थित असलेल्या जनतेला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि स्थानीय नेत्यांचे हात मजबूत करण्याचे आव्हान केले यानंतर सभेकरीता आलेले काही पाहुण्यांनी सुद्धा उभाठा पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याकरिता सांगितले, मात्र सभेचे मुख्य पाहुणे गैरहजर राहिल्याने आलेल्या जनतेमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसले तर धामणगाव विधानसभा मतदारसंघात मात्र अनेक चर्चेला उधान फुटले आहे, सोबतच आयोजक समितीकडून सावित्रीबाई यादव सभागृह येथे आलेल्या लोकांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती पण नियोजना अभावी लोकांना उपाशी तपाशी पोटी परत आपल्या आपल्या गावाला जावे लागले,