111 वर्षा नंतर जळका (पटाचे) येथे होणार पुन्हा विदर्भातील पहिला मानाचा पट सुरु

0
71
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पराग राऊत पाटील                                            सरपंच ग्रा प जळका (पटाचे)

ग्राम पंचायत जळका (पटाचे)अंतर्गत येणाऱ्या मौजा जळका (पटाचे)शेत गट न. 215 (5 हे 45आर )ही इ वर्ग जमीन ग्रामसभेने आजीवन शंकर पटा करिता आरक्षित केली आहे

ग्राम पंचायत जळका(पटाचे) ने 26 जानेवारी 2025 ला ग्रामसभेमध्ये गावातील जनतेच्या मागणी नुसार सदर जमीन ही आजीवन शंकर पटा करिता आरक्षित केली.गावातील जुन्या परंपरा व गावाचे नाव सार्थक करण्याच्या दृष्टीने गावामध्येच शंकर पट भरविण्याच्या दृष्टीने ग्रामसभेने एक मताने ठराव घेऊन तेव्हाच शंकर पट भरविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले होते.

ग्राम पंचायत जळका(पटाचे) च्या संपूर्ण पदाधिकारी यांच्या पुढाकारणे व गावकाऱ्यांच्या सहकार्याने आमच्या गावात पट भरविण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

सर्वे नंबर 215 क्लास जमीन शंकर पट भरविण्याकरिता आजीवन राखीव केली असून पुढील नियोजनाकरिता व शंकर पट भरविण्याची जिम्मेदारी गावातीलच “श्री गजानन कृषी गट” यांना सदर जमीन 99 वर्षाच्या लीजवर देऊन शंकर पट भरविण्याकरता गटाला हे “विदर्भ केशरी शंकर पटाचे मैदान” देऊन शंकर पट भरवण्याची संपूर्ण जबाबदारी ही गटामार्फत पूर्ण करण्याचे ठरविले आहे,

ही जिम्मेदारी श्री गजानन कृषी गट वेवस्तीत पार पाडेल याचा आम्हांला विश्वास आहे, येणाऱ्या 29, 30, 31 डिसेंबर ला जागेवर भव्य दिव्य जंगी शंकर पटाचे आयोजन होणार असून खऱ्या पट शौकीनांन करिता या मानाच्या पटाची लवकच नव्या उत्साहात एन्ट्री होणार आहे.

पटाचे नियोजन चांगल्या प्रकारे करून भविष्यात गावातील जुन्या परंपरेला उजाळा देण्याकरिता ग्रामसभेने जनतेने मोठा निर्णय घेतलेला आहे याकरिता गावातील श्री गजानन कृषी गट हे संपूर्ण खर्चाचा भार उचलून तसेच संपूर्ण गटाची नियोजन करणार आहे लवकरच या स्वप्नाची पूर्तता होणार असून 29 30 31 डिसेंबरला जळका (पटाचे)येथील विदर्भ केसरी शंकर पाटच्या मैदानात भव्य दिव्य मानाचा जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात येणार आहे त्या मुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात वेगळाच उत्साह संचारला आहे:

खरे तर अशे म्हटल्या जाते की ही पटाची परंपरा जळका पटाचे येथे ब्रिटिश कालीन असून जुन्या सी पी अँड बेरार काळात हा पट या गावाला सुरु झाला तेव्हा मध्य भारतातील म्हणजेचच विदर्भातील हा पहिला शंकर पटा ची सुरवात याच गावा पासून झाली त्या मुळे त्या काळातच या गावाला” पटाचे ” म्हणजे आजचे जळका (पटाचे) हे नाव लाभले ही गावा करिता स्वाभिमानाची व अभिमानाची गोस्ट आहे,

काही कारणास्तव हा पट अंदाजे 111 पूर्वी बंद होऊन हा पट तळेगाव दशासर परिसरात ट्रान्सफर करण्यात आला होता आज तिथे सुद्धा जानेवारी महिन्यात मोठया उत्साहात पटाचे आयोजन करण्यात येते व त्यांनी सुद्धा ही परंपरा कायम सुरु ठेवली त्या मुळे त्यांचे अभिनंदन च करावे लागेल,

आता जळका (पटाचे ) गावाने सुद्धा जुन्या परंपरेला नव्याने उजाळा देण्याचे ठरविले असून या मध्ये परिसरातील नामांकित बैलगाडा प्रेमी *श्री अशोकरावजी घारफळकर यांच्या मार्गदर्शनात व डॉ आशिषजी सालणकर यांच्या अध्यक्षेत* तसेच आयोजन समिती “*श्री गजानन कृषी गट*” हे पटाचे यशस्वी रित्या येत्या 29,30,31 डिसेंबरला करण्यात आहे त्या करिता मी गावचा सरपंच म्हणून आमच्या पूर्ण गावा तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.

खऱ्या अर्थाने आमच्या गावाला म्हणजे जळका (पटाचे ) आज नव्याने उजाळा भेटत आहे व हा खरा पट शोकीनाचा पट असणार आहे याचा आम्हाला गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे व संपूर्ण गाव या पटाच्या उत्साहात सहभागी होऊन हा कार्यक्रम आनंदाने व उत्साहाने पार पडणार आहे.

veer nayak

Google Ad