श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स येथे पालकांसाठी एअरोबीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून योगा प्रशिक्षक रिना ठाकूर यांचे योगदान लाभले पर्यवेक्षिका शबाना खान यांनी योगा प्रशिक्षक रिना ठाकूर यांचे वेलकम कार्ड आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपले आरोग्य स्वस्थ व तंदुरूस्त राहण्यासाठी व्यायाम खूप महत्वाच्या आहे तसेच आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमीत व्यायाम करणे गरजेचे आहे ही माहिती रिना ठाकूर यांनी दिली.
एअरोबिक वर्कशॉप मध्ये पालकांनी व शिक्षिकांनी सहभाग घेतला. मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती. या कार्यशाळेला यशस्वी बनविण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षिका प्रणिता जोशी, रेणूका सबाने, वर्षा देशमुख, वृषाली काळे ,हर्षदा ठाकरे ,राणी रावेकर ,आकांक्षा महल्ले ,प्राजक्ता दारुंडे यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.