गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पुनर्वसीत नागरिक,व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक सुशिक्षित बेरोजगार आपल्या न्याय हक्कासाठी अत्यंत रास्त व माफक अशा मागण्यांसाठी अविरत संघर्ष करीत असुन सरकार मात्र या अन्नदाता जलदात्यांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी राज्य सरकारच्या उदासीन धोरणाला व आपले कर्तव्य विसरलेल्या स्थानिक जनप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्यांसारखे पावलं उचलत असुन हि पुरोगामी महाराष्ट्रा साठी अत्यंत लाजीरवाणी व खेदाची बाब असल्याचे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांनी प्रकल्पग्रस्तांच्या निर्धार सभेतून सांगितले नुकतेच अमरावती येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना विदर्भ प्रदेशच्या वतीने निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेमध्ये विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वाशिम, अकोला,बुलढाणा अमरावती, गडचिरोली या विविध जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त पदाधिकारी उपस्थित होते.हजारो प्रकल्पग्रस्तांनी अमरावती ते नागपूर काढलेल्या लॉंगमार्च दरम्यान १३ डिसेंबर २०२३ रोजी विधान भवन नागपूर येथे राज्याचे जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळा सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची भुमिका घेऊन १५ जानेवारी २०२४ ला प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर अंतिम बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्तांना गोड बातमी देणार असल्याचे तोंडी आश्वासन दिले होते परंतु त्यावर कोणतीच कारवाई झाली नसुन देवेंद्र फडणवीस दिलेल्या शब्दाला मुखरले असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी अत्यंत संतापलेल्या शब्दातुन आपल्या भावना व्यक्त करीत असल्याचे दिसून येते. विधानसभा लोकसभा प्रतिनिधींच्या संदर्भात प्रकल्पग्रस्तांमधे प्रचंड संतापाची लाट असून येत्या निवडणुकीत प्रकल्पग्रस्तांच्या लाखों मतांना जनप्रतिनिधींना मुकावे लागणार असल्याचेही सूर या निर्धार सभेतून ऐकायला मिळाले. निवडणुकीत उमेदवारांना गावबंदी मतदानावर बहिष्कार, बहिष्कार सभा, निषेध सभा. अशा विविध आंदोलनाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.असुन येत्या चार दिवसांत सरकारच्या स्तरावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर हजारो प्रकल्पग्रस्त पुन्हा रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा या निर्धार सभेतून देण्यात आला असून जनप्रतिनिधींनी याचा वेळीच सकारात्मक विचार करावा व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ताकदीने प्रयत्न करावा असे मत जेष्ठ प्रकल्पग्रस्त डॉ अशोकराव केवले यांनी जनप्रतिनिधींना उद्देशुन व्यक्त केले. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आप आपल्या मतदारसंघातील प्रकल्पग्रस्तांचे मेळावे घेऊन संघटनेच्या आंदोलनात्मक अजेंड्यावर जनजागृती करण्याचे आवाहन संघटनेचे सचिव सुनील भाऊ घटाळे यांनी केले.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ काळे, कोषाध्यक्ष संजय गीद,अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ मुरादे, उपाध्यक्ष शेख हबीब भाई.वाशीम जिल्हा उपाध्यक्ष शेख रियाज पटेल, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर वानखडे, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश कोमावार, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रोषण धवल, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष उमेश बुल, भंडारा जिल्हा अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी नागपूर जिल्हा अध्यक्ष गजानन ठाकरे, गौतमराव खंडारे, दिलीप भाऊ कदम,राजुभाऊ लोनकर, मनोजभाऊ तंबाखे, निलेश भाऊ ठाकरे, डॉ दिलीप चौधरी,राजेश भाऊ खेळकर अन्नाजी सोनवणे, अनिल भाऊ खेळकर, शुभम दवंडे राजेश चौधरी, शुभम डोनालकर, भाटुसिंह पवार, रुपेश उघडे, पद्माकर शिवरगा,दिलीप कवर, नरेश वानखडे, सचिनभाऊ गोमकाळे, मोहनराव गोमकाळे, मोहन भाऊ बोबडे, मधुकराव नवले.गणेशभाऊ कोंडाणे, तसेच विविध जिल्ह्यातील प्रकल्प निहाय संघटनेचे शेकडो प्रतिनिधी ,कार्यकर्ते उपस्थित होते.