धामणगाव रेल्वे,
समृद्धी महामार्गावर नुकतंच रात्रीच्या वेळी गोवंश वाहतूक करणारा ट्रक नागपूर ते पुणे कडे ३८ जनावरे धेउन जात असताना रोड वर उभ्या असलेल्या एका ट्रक ला धडकला. त्यामुळेच ट्रक मध्ये अवैधरित्या मोठया प्रमाणात गौवंशाची तस्करी होत आहे ही गोष्ट उधडीस आली असतानाही समृद्धी महामार्गावर अशा गोष्टींना अंकुश कसा बसणार हा यक्ष प्रश्न आहे या महामार्गावर प्रत्यक्ष वाहनांची तपासणी होत नसल्यामुळे आणि अनेक वाहनांची अति वेगवान गती पाहता सध्या समृद्धी महामार्ग तस्करांचा मुख्य मार्ग आणि अड्डा बनलेला आहे गोवंश प्रमाणेच आणखीही अवैध वस्तूंची तस्करी होत असेल हे नाकारता येत नाही त्यामुळे समृद्धी महामार्गावर अवैध तस्करी आणि अवैध कारभाराला वचक घालण्याकरिता विशेष पोलीस पथकाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
उपरोक्त बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खूप उपयोगाचा आणि वाहतुकीसाठी सोपा आणि सरळ मार्ग म्हणून राज्य शासनाने या महामार्गाची निर्मिती केली या महामार्गामुळे सर्व स्तरावरील नागरिकांना लाभ होतो आहे परंतु काही तस्कर तसेच महामार्गावरील गाडींची अंधाधुंद स्पीड या गोष्टींवर आळा बसवणे आवश्यक आहेच त्यामुळे राज्य शासनाने या विषयाला गंभीरतेने घेणे अत्यावश्यक आहेच
याच महामार्गावर दोन दिवसांपूर्वी अपघात झाला ते अपघात स्थळ मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ दाखल होवून त्यांनी पशुधन विकास अधिकारी पापड यांच्याशी संपर्क साधला जखमी जनावरांना औषधोपचार करण्यासाठी डॉ. हेमंत जाधव पशुधन विकास अधिकारी पापड, डॉ.निरंजन डांगे पशुधन पर्यवेक्षक फुल आमला ,डॉ.राजीव गाडगे पशुधन पर्यवेक्षक भुगाव , डॉ. देवानंद पायघन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मंगरूळ चव्हाळा यांनी चमू घटना स्थळी हजर झाली. जखमी पशुंची तपासणी केली व ३८ जनावरा पैकी १० जनावरांना मृत घोषित केले व उर्वरित २८ जनावरांवर योग्य तो औषधोपचार करून त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख गौशाळा कणी मिर्झापूर ता.नांदगाव खंडेश्वर येथे पाठवण्यात आले व मृत जनावरांचे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पडीत जागेवर विधीवत पूजन करून पुरण्यात आले त्या वेळी मंगरूळ चव्हाळा चे ठाणेदार रवींद्र बारड, मनोज सावरकर पी एस आय व पोलिस अंमलदार हटवार व ईतर कर्मचारी हजर होते. पुढील तपास मंगरूळ चव्हाळा चे ठाणेदार व त्यांचे सहकारी करत आहे. या सर्व गोष्टीला वचक बसण्याकरिता विशेष पोलीस पथकाचे या महामार्गावर नियंत्रण हे एकच मार्ग उपयोगी ठरू शकते