धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगांव धांदे गावात 2021 मध्ये शासनाच्या वतीने व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यात आले होते.

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

परंतु आजची परिस्थिती पाहता तीन वर्षे होऊन गेली आहेत अद्यापही व्यायाम शाळा सुरू होण्याच्या मार्गावर तर आहेच नाही परंतु आजतागायत व्यायाम शाळेची इमारती ही अर्धवट स्वरूपात उभी आहे सदर व्यायाम शाळेच्या इमारतीला प्लास्टरिंग झालेली नाही, कलरिंग नाही, खिडक्या -दरवाजे नाहीत, पाहिजे पायऱ्या नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही, इलेक्ट्रिक लाईन सुद्धा नाही. शासनाच्या पैशाची उधळपट्टी झालेली असून व्यायाम शाळेच्या ईमारत बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नाकारता येत नाही.

बांधण्यात आलेली व्यायाम शाळेची ईमारत ही फक्त शोभेची वास्तू म्हणून उभी असून जुगार, स्मोकिंग झोन, गलिच्छ बनली आहे. संबंधित व्यायाम शाळेची साफसफाई, खिडक्या – पायऱ्या, पाण्याची व्यवस्था तसेच इलेक्ट्रिक लाईनची व्यवस्था करून देण्यात यावी अशी शिफारस ग्राम पंचायत बोरगांव धांदे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.सदर व्यायाम शाळा सुरु न झाल्यास ग्राम पंचायत बोरगांव धांदे कार्यालया समोर उपोषण करण्याचा ईशारा गावातील सामाजिक कार्यकर्ते विक्रम वसंतराव उईके दिला आहे.

veer nayak

Google Ad