तळेगाव दशासर :- कृषक सुधार मंडळ ,तळेगाव द द्वारा संचालित माध्यमिक कन्या विद्यालय ,तळेगाव येथेदि 28 जुलै सोमवारला कृषक सुधार मंडळ तथा माध्यमिक कन्या विद्यालय चे संस्थापक अध्यक्ष प पु स्व बापूसाहेब देशमुख यांची 30 वि पुण्यतिथी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मा श्री शिवाजीराव बा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली .प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री भुपेंद्रदादा नाईकनिंबाळकर ,श्री विनोदराव रामेकार,श्री मोहनराव देशमुख ,श्री नरेंद्रजी रामावत ,सौ शुभांगी देशमुख ,श्री विनोद देशमुख , सरपंच सौ मीनाक्षी ठाकरे, सौ. भारती चूटे,सौ. निता गवळी,सौ. अनिता मेश्राम,सौ अनुश्री देशमुख,श्री आनंद देशमुख,श्री पंकज देशमुख,श्री रवीभाऊ चुटे,श्री प्रभाकर कावळे ,श्री श्रेयस देशमुख, पत्रकार भाऊराव इंगोले, शकील भाई,सुयोग ठाकरेशिक्षक पालक संघ सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकवर्ग उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .फोटो पूजेनंतर शिक्षणमहर्षी बापूसाहेब देशमुख यांच्या जीवनपटाचे अनावरण करण्यात आले.पुण्यतिथी निमित्त कृषक सुधार मंडळ द्वारा संचालित कै नानासाहेब देशमुख मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींना गणवेश ,स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मार्च 2025 च्या शालांत परीक्षेत प्रथम चारआलेल्या कु भाविका बागडे,कु त्रिशाली मेश्राम ,कु मयुरी चौधरी व रेणुका गायकवाड याना पुष्पगुच्छ व वर्ग 11 वीचे शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. कृषक सुधार मंडळ, डॉ विनोदराव देशमुख ,सौ भारती चुटे,सौ निता गवळी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ग 5 वीच्या विद्यार्थिनींना स्पोर्ट ड्रेस चे वाटप करण्यात आले.प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापिका सौ देशमुख यांनी प पु बापूसाहेबांचा थोडक्यात जीवनपट सांगितला .उपस्थित मान्यवर मा श्री मोहनराव देशमुख ,श्री विनोद देशमुख ,श्री नरेंद्र रामावत यांनी या प्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले .
अध्यक्षीय भाषणात मा श्री शिवाजीराव देशमुख यांनीबापूसाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. मान्यवरांच्या हस्ते एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन कु मरसकोल्हे यांनी व आभारप्रदर्शन कु पांडे यांनी केले. श्री थोरात,सौ थोरात, वैष्णवी विरुळकर,मोहिनी देशमुख , पायल कऱ्हाडकर ,श्री पोट,श्री कावळे आणि सर्व विद्यार्थिनींच्या यांच्या सहकार्या ने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला