नैसर्गिक शेतीवर भर जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती सभा संपन्न

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 21 केंद्र शासनाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेस मंजूरी दिलेली आहे. या मिशनची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती व तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यासाठी एकूण 3 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर 70 शेतकरी गट स्थापन करण्याचे लक्षांक प्राप्त आहे.

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची नुकतीच आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये समितीमधील सदस्य यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत विविध घटकांच्या आधारे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील मुख्य नद्यांच्या काठावरील गावे या घटकामधून चांदुर बाजार व तिवसा मधील एकूण 20 गावे (ग्रामपंचायत संख्या 18), जास्त खते वापर असलेली गावे या घटकामधून मोर्शी व वरुड मधील एकूण 17 गावे (ग्रामपंचायत संख्या 14), कमी खते वापर असलेली गावे या घटकामधून नांदगाव खंडेश्वर व चिखलदरा एकूण 34 (ग्रामपंचायत संख्या 19) गावे तसेच दुर्गम भागातील समाविष्ट गावे या घटकामधून धारणी मधील एकूण 11 गावे (ग्रामपंचायत संख्या5) याप्रमाणे संपूर्ण जिल्हयामधील एकूण 56 ग्रामपंचातीमधील 82 गावांची निवड करण्यात आलेली आहे.

लक्षांकाप्रमाणे एकूण 70 शेतकरी समूहांची निवड करण्यासाठी सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून इच्छुक 125 शेतकऱ्यांना प्रती शेतकरी एक एकर क्षेत्रासाठी सहभागी करून घेण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येकी दोन कृषी सखींची निवड करण्यात येणार आहे. नैसर्गिक पद्धतीवर आधारित स्थानिक पशुधन शेती पद्धती लोकप्रिय करणे, जमिनीचा पोत सुधारणे, बाहेरुन निविष्ठा खरेदी कमी करून शेतावरच आवश्यक निविष्ठा निर्मिती करणे व त्याचा वापर वाढविणे, शेतमाल उत्पादनाचा खर्च कमी करणे आणि सहभागी शेतकऱ्यांच्या शेतीचे नैसगिक शेती प्रमाणिकरण करणे ही अभियानाची उदिष्टे आहेत. या अभियानात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका सनियंत्रण समिती अध्यक्ष तथा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी केले आहे.

00000

उमेद अंतर्गत स्वयं सहाय्यता समूहाची मिनी सरस प्रदर्शनी दि. 24 ते 28 जानेवारीपर्यंत

अमरावती, दि. 21 (जिमाका): ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे सबलीकरण करणे व उपजीविका आधारित उपक्रम राबविणे यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वयं सहाय्यता समूहाने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दि. 24 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान विक्री प्रदर्शनीचे आयोजन मुख्य बस स्थानक समोर, सायन्स स्कोर मैदान, अमरावती येथे आयोजित करण्यात येत आहे.

या प्रदर्शनीमध्ये अमरावती जिल्ह्यातील 60 स्वयं सहाय्यता समूह तसेच इतर जिल्ह्यातील 10 स्वयं सहाय्यता समूह असे एकूण 75 समूहाचे स्टाँल्स लावण्यात येत आहेत. या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ, तसेच इतर आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदीसाठी ठेवण्यात येणार आहे. या मिनी सरस प्रदर्शनामध्ये 7 स्टाँल्स शाकाहारी ज्यामध्ये (रोडगे, पिठल, भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी, थालीपीठ ) यांचा समवेश आहे तर 8 स्टाँल्स मासाहारी (चिकन, मटन, मांडे, ज्वारी, बाजरी़ भाकरी) या विदर्भातील ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

या प्रदर्शनीमध्ये नागरिकांना मिक्स मिलेट्स कडधान्य, सर्व प्रकारचे मसाले, डिंक लाडू, पंचरत्न लाडू, मोह लाडू, डिंक लाडू, ज्वारी, बाजरी, सोया प्रोडक्ट्स, सोया इडली, ढोकळा, मोरिंगा पावडर, हळद पावडर, सर्व प्रकारची लोणची, खारोडी, मुगवडी, जवस चटणी, खंडू चक्का तेल, शुद्ध देशी गाईचे तूप, गाईचे शेणापासून बनविलेल्या धूपबत्ती, मकरसंक्रांतनिमित्त हलव्याचे दागिने, तीळ-गुडिया व बांबू पासून विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी या प्रदर्शनामध्ये मिळणार आहे.

स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना प्रोत्साहान देण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनीला भेटदेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad