धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये नविन तुर खरेदी चा शुभारंभ नविन तुरीला मिळाला भाव ८१११ रु.

0
39
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगांव रेल्वे धामणगांव रेल्वे येथील बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रियात गुरुवार १६ जानेवारी ला नवीन तुर खरेदीचा चा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते शेतक-यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शेतक-यांच्या नवीन तुरीला ८१११ रु. भाव मिळाला.

शेतकरी हिताचे निर्णय घेणारी बाजार समिती म्हणून नाव लौकिक असलेल्या येथील धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समिती लिलाव प्रक्रियेत गुरुवारी बाजार समितीच्या सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते यंदा नविन तुर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच बाजार समितीचे सचिव प्रविण साहेबराव वानखडे संचालिका सौ संगिता संजय गाडे, संचालक राधेश्याम ल. चांडक, गिरीष सो. भुतडा यांच्या हस्ते शेतकरी बंधुंना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नवीन तुरीला ८१११ रु. प्रति क्विंटल दर मिळाला यावेळी धामणगांव तालुक्यातील विरुळ रोघे येथील शेतकरी नितीन गजभिये यांच्या तुरीला मे. मनिष ट्रेडर्स खरेदीदार प्रोप्रा मनिष केला यांच्या खरेदी मध्ये ८१११ रु. भाव मिळाला तसेच मे. राज ट्रेडर्स चे प्रोप्रा राजेन्द्र अग्रवाल तसेच गणेश ऑईल मिल चे खरेदीदार प्रोप्रा संजय अग्रवाल यांच्या खरेदी मध्ये शुभांरभ करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित व्यापारी/ अडते राजेश गंगन सचिन गंगण,आयुष गंगन , प्रेमकुमार टावरी मनीष भट्टड सचिन मुंधडा शैलेश वसांनी , सुरेंद्र जयस्वाल कमल झवर, राजेंद्र पणपलिया ,प्रवीण पणपालिया, पवन लाहोटी आनंद काकंक्रिया, संतोष लाहोटी, मुकेश पनपालिया, रमेश ठाकरे, नरेन्द्र राठी, गोवर्धन राठी, महेश गंगण, प्रदीप राठी, रुपेश वानखडे, दीपक राजनकर नंदलाल राठी, देवरावजी कापसे, आशिष कापसे समितीचे यार्ड प्रमुख संजय तुपसुंदरे, राजु तायडे, भुषण जुमडे, नितीन मांडवगणे, दिनेश गोमासे, दिलीप पाटील, रेखा कुयटे, प्रियंका जगताप, कविश मेटे, रामेश्वर वानखडे आदित्य भिवरकर, आतिश कोरडे, पवन श्रीखंडे प्रतिक अर्जुने, सुरज तुपसुंदरे इत्यादी व मोठ्या संख्येने शेतकरी बंधु आडते, व्यापारी, हमाल/मापारी बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad