आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि. 16/01/2025 रोजी आर्वी येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा व वाहतूक शाखा आर्वी यांनी संयुक्तपणे रस्ता सुरक्षा अभियान द्वारे बाईक रॅली काढून नागरिकांना नियमाबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये गाडी चालवत असताना घ्यावयाची काळजी हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे, वाहतुकीचे नियम याबाबत माहिती देण्यात आली. ही रॅली रेस्ट हाऊस पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पद्मावती चौक, गांधी चौक ते बस स्टॅन्ड मार्गे वर्धा टी पॉईंट, साईनगर, वापस रेस्ट हाऊस पर्यंत काढण्यात आली.
यामध्ये सहाय्यक वाहतूक निरीक्षक अमर पखान साहेब, सोबत विकी सातपुते, बाळू कीटुकले, आर्वी वाहतूक शाखेचे विलास राठोड, बाबासाहेब गवळी असे सहभागी होते. तसेच आर्वीतील नागरिक यांनी पण रस्ता सुरक्षा मोहीम रॅलीमध्ये प्रामुख्याने युवा व युवती सहभागी होते.