शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराजांचा दिनांक -16 जानेवारी हा राज्याभिषेक दिन सोहळा..

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्वराज्य रक्षणासाठी
जो वाघ एका फौलादी
स्तंभासारखा उभा होता..
तो आमच्या शिवरायांचा संभा होता..

घोड्याच्या पाठीवर तुफान घेऊन 9 वर्ष जे वादळ सहयाद्रीने अनुभवलं..
ज्यांचा पराक्रम पाहून भीमा, इंद्रायणी ही गहिवरल्या…
                     ज्यांच्या डरकाळीने दिल्लीचे तख्तही हादरायचे अशा धाकल्या धन्याचा….                                    शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराजांचा दिनांक -16 जानेवारी हा राज्याभिषेक दिन सोहळा..

छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी खचलेल्या रयतेला आधार दिला. थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील याची हमी दिली. खऱ्या अर्थाने शंभुराजांनी लोकांना परत एकदा उभे केले. त्यांच्यात इतका स्वाभिमान भरला की श्री शंभुराजांच्या जाण्यानंतरही इथली रयत त्या स्वाभिमानावर अविरत झुंजत राहिली.औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी इथल्याच मातीत संपवले..
से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर ” रौद्रशंभू ” छत्रपती श्री संभाजीराजे यांचे राज्याभिषेक दिन सोहळा निमित्ताने व्यक्तिचित्र साकार करून त्यांना मानाचा मुजरा केला  आहे…

veer nayak

Google Ad