सकाळी ध्यानाने युवक दिनाची सुरुवात करून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मोहम्मद उज्जैन वाला सीबीएससी प्राचार्य सुशांत देवनाथ प्रमुख अतिथी म्हणून श्रेयस लायस्कर उपस्थित होते.
यावेळी ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित प्रसंग सांगून युवकांमधील संघटन शक्ती कशी असावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले प्राचार्य मोहम्मद उज्जैन वाला यांच्या हस्ते वस्तीगृहामध्ये राहणारे युवा कर्मचारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मदत केली त्याही युवकांना पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य मोहम्मद उज्जैन वाला यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये चांगला युवक व्हावा व त्याच्या हातून चांगले कार्य निर्माण करून राष्ट्र बांधणी करावी असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला या कार्यक्रमाला अंकुश डुकरे महेश धांदे सागर ननावरे हर्षल पाटील गोकुळ काळे मयूर बालपांडे रवी भगवी हर्ष गावंडे सोमेश बिसने अजय सुलतानी मनीष मोरे अभिजीत सातपुते शुभम मोरे अभिषेक डुकरे शहा सर किशोर सुकळकर आकाश महल्ले इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला शेवट शांतीपाठाने करण्यात आला.