(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर युथ फॉर माय भारत डिजिटल लिटरसी या थीमवर ग्राम शिदोडी तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे दिनांक ७/१/२०२५ ते १३/१/२०२५ दरम्यान संपन्न होत आहे. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज व श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय रुग्णालय अमरावती यांचे सहकाऱ्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून श्री. रामदासजी निस्ताने तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच श्री. रितेश जी निस्ताने श्री योगेश पानझडे, श्री मनोज भाऊ देशमुख, श्री विवेक देशमुख, श्री. काळे सर, श्री उमेश शिवरकर, श्री मनोहरराव निस्ताने, सौरभ इंगळे, प्रा पवन शिवणकर, प्रा दीपक बोंद्रे उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व परमहंस सद्गुरु श्री. संत शंकर महाराज तसेच आचार्य नरेंद्र महाराज व पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय, अमरावती यांचे द्वारे २७ शिबिरार्थी व २४ गावकरी असे एकूण ५१ जणांनी रक्तदान केले यावेळी ३६५ दिवस रक्तदान या योजनेद्वारे खासदार डॉ अनिल बोंडे यांचे संस्थेद्वारे सर्व रक्तदात्यांना विशेष रक्तदान प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. व इर्विन हॉस्पिटल अमरावती द्वारे सुद्धा रक्तदान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुश्री पूलकंटवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन यश काळे यांनी केले.
रक्तदान शिबिराचे यशस्वी नियोजनासाठी आचार्य नरेंद्र महाराज जिल्हा संघाचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी, श्री. गजाननराव निस्ताने, श्री सचिन निस्ताने, ग्राम शिदोडीचे सरपंच, उपसरपंच, व सर्व पदाधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ संदीप हाडोळे, महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नंदूशेठ चव्हाण, महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजूभाऊ भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, प्राचार्य वृषाली देशमुख, प्रा. दीपिका निंबाळकर, श्री सुहास आप्तूरकर, आशिष लावरे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले
Home आपला विदर्भ श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरामध्ये रक्तदान...