दादासाहेब उपाख्य हरीभाऊ साकरे सेवा प्रतिष्ठान उदयोन्मुख व नवोदित प्रतिभांना संधी देणारे व्यासपीठ….. संजय साकुरे यांचे प्रतिपादन

0
15
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे, वार्षिक पुरस्कार श्रृंखलेच्या माध्यमातून समाजातील नव्या, उदयोन्मुख आणि नवेदित प्रतिभांना संधी आणि प्रोत्साहन देऊन त्यांचा मराठी साहित्य विश्वाला परिचय करवून देणारे व्यासपीठ म्हणजे दादासाहेब उपाख्य हरीभाऊ साकुरे सेवा प्रतिष्ठान आहे असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे समन्वयक संजय साकुरे यांनी केले

स्व. दादासाहेब उपाख्य हरीभाऊ साकुरे सेवा प्रतिष्ठाण, धामणगांव रेल्वे व श्री दत्त मंदिर संस्थान, शिरजगांव कसबा यांचे संयुक्त विद्यमाने श्री. दत्तमंदिर संस्थान स्व.दादासाहेब साकुरे सृजनपर्व पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला. स्व.दादासाहेब उपाख्य हरीभाऊ साकुरे सेवा प्रतिष्ठाण हे सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यीक क्षेत्रात अत्यंत मूलभूत स्वरुपात महाराष्ट्रभर काम करीत आहे राष्ट्र व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या हरीभाऊ साकुरे यांच्या देहावसानाला १० वर्षे पूर्ण झाली असल्याने दशकपूर्ती पुण्यस्मरण सृजनपर्व सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य राजेंदपंत सावरकर होते. प्रमुख पाहूणे म्हणून संजय साकुरे, विजय साकुरे, सौ. पूनम साकुरे सौ. नम्रता सावरकर, सचिन सावरकर, सौ. ज्ञानज्योती तरार, श्री. दिगांबर तरार व राजेंद्र लकारे उपस्थित होते. याप्रसंगी हरी साहित्य कथा व कविता पुरस्कार श्रृंखलेतील नवोन्मेष आणि अक्षर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारासाठी संपूर्ण विदर्भातून प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. जीवनसन्मान पुरस्कार (व्यक्ती) जेष्ठ साहित्यीक प्रा. विठ्ठल कुलट यांच्या प्रदिर्घ साहित्यसेवा आणि वैद‌र्भियन मराठीच्या संवर्धन आणि प्रचारासाठी प्रदान करण्यात आला. तसेच जीवनसन्मान पुरस्कार (संस्था) श्री नवजीवन दुर्गोत्सव मंडळ, सटवाईपुरा, शिरजगांव कसबा यांना अभिनव आणि अनुकरणीय उपक्रमासाठी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी नरेंद्र सावरकर,किरण सोनार, प्रमोद वांगे, सौ. चारुलता संजय थेलकर, हरीओम वांगे, मुकुंद वांगे, सौ. रेखा वांगे, देवेंद्र लांडे, सौ. छाया लांडे यांना सन्मानित करण्यात आले. स्व.सौ. सुनंदा चंद्रकांत लांडे यांना मरणोत्तर ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रा. कुलट, विजय सोसे, मंगेश वानखडे यांनी आपल्या कवितांनी कार्यक्रमात रंग भरले. श्रीमती नमता सावरकर आणि विजय साकुरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर साकुरे, अशोक साकुरे, विनोद साकुरे या प्रतिष्ठानच्या समन्वयकांनी मोलाचे योगदान दिले. गणेशराव तडस, नंदकिशोर सावरकर, संजय सावरकर, मुरलीधर सावरकर, मोहनराव टाकरखेडे,प्रतिक सावरकर, सात्विक सावरकर, औकार जावरकर, शुभम गणोस्कर, मनोज भातकुले, पंकज सावरकर, विनोद जावरकर, निलेश पारधी, सतिश नागोत मंगेश हाडोळे, लोकेश वांगे, अथर्व चतूर, संकेत पारधी, निखिल जावरकर, विनय जावरकर, आयुष रसे नितिन पेटे, यश येलकर, निखिल पारधी, गौरव दहेकर प्रतिष्ठाणचे समन्वयक आणि श्रीदत्त मंदिर संस्थानच्या कार्यकारीणीने प्रस्तुत दशकपूर्ती समारंभाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad